नाशिक

पाणी गळती दुरुस्तीने शहराला दिलासा

CD
SNR26B22980 सिन्नर ः कडवा पाणीपुरवठा योजनेची गळती दुरुस्ती प्रसंगी आढावा घेताना विठ्ठल उगले, हर्षद देशमुख, दत्ता हांडे, देवा आवारे आदी. ----------------- ३६-४ सिन्नरकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू ---------- कडवा पाणी योजनेच्या व्हॉल्वची युद्धपातळीवर दुरुस्ती ----------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.६ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कडवा पाणी योजनेच्या मुख्य व्हॉल्व्हला सतत गळती होत होती. ही गळती दुरुस्त झाल्यानंतर मंगळवारी (ता.६) सायंकाळी पाणी पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, दत्तात्रय हांडे, देवा आवारे, अजित गिते यांच्यासह दुरुस्ती पथकाने सहा तासात गळती दुरुस्ती पूर्ण केली. नवरात्रोत्सव सुरु होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात आले. गेल्या काही दिवसापासून कडवा धरणाजवळील मुख्य व्हॉल्व्हला गळती वाढली होती. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होत नव्हते. दोन दिवसाआड असलेला पाणीपुरवठा चार दिवसाआड होऊ लागला होता. नवरात्रोत्सव व दीपावलीच्या काळात नागरिकांना पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी तातडीने गळती दुरुस्त करण्यात आली. शहराला पुरेसा दाबाने पाणी पुरवठा व्हावा, गरजेइतके पाणी दररोज उपलब्ध करता यावे यासाठी दुरुस्तीची तीन कामे दिवाळीनंतर करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. शहरात १८ हजाराहून अधिक नळधारक आहेत. त्याची रोजची किमान सव्वा कोटी लिटर पाण्याची गरज आहे. सध्या ८० ते ९० लाख लिटर पाणी उपलब्ध होते. पुरेशा क्षमतेने पाणी उपलब्ध होण्यासाठी नगरपरिषदेने दिवाळीनंतर आणखी कामे हाती घेणार असल्याचे कळविले आहे. ----------

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT