Kelwa Beach death of 3 youths Nandgaon nashik sakal
नाशिक

केळवा बिचवर टिपलेला फोटो ठरला अखेरचा; ३ तरुणांच्या मृत्यूने नांदगावात शोककळा

तरुणांच्या अचानक एक्झिटने गहिवर!

संजीव निकम,नांदगाव

नांदगाव : पालघरच्या केळवा बीचवर पोहचलेल्या नांदगाव तालुक्यातील तिघा तरूणांना काळाने गाठले. अचानक झालेला मुलांचा मृत्यू सगळ्यांना चटका लावून गेला. समुद्रातील टिपलेले त्यांचे छायाचित्रही अखेरचे ठरले. सकाळचे छायाचित्रकार शंकर विसपुते व प्रसिद्ध आचारी  अशोक विसपुते यांचा ओम हा पुतण्या. ओमचे वडील दीपक बसस्थानकाजवळील मोकळनगरात राहतात. त्यांचा बॅटरी दुरुस्तीचा व्यवसाय येवला रस्त्यावर एका गाळ्यात आहे. याच रस्त्याच्या त्यांच्या दुकानासमोर जगदीश शेलार यांचे वेल्डिंग शॉप आहे.

जगदीश यांचा कृष्णा हा मुलगादेखील ओम विसपुतेसारखा अकरावी सायन्सला शिकत होते. मात्र, खादगावचा दीपक वडक्ते हा बी. एड झालेला व ‘निट’साठी नाशिकच्या ॲकॅडमीत अलिकडेच प्रवेश घेतलेला. साकोऱ्याचे यश बोरसे, साहिल बोरसे, ओम विसपुते, कृष्णा शेलार, दीपक वडक्ते असे पाचही जण नाशिकलाच अशोक स्तंभाजवळ एका ठिकाणी रूममेट म्हणून राहत होते. ॲकॅडमीच्या सहलीला गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत आपल्या तिघा मित्रांचा अकाली झालेला मृत्यू या अन्य दोघा मित्रांसाठी धक्कादायक ठरला. तिकडे मोकळनगरला ओमच्या घरी आईला अजून कळविलेले नव्हते. अशीच अवस्था खादगावात होती. वडील चिंधा यांना कळवायचे कसे, या विंवचनेत ग्रामस्थ होते. काका अशोक, शंकर व अन्य नातेवाईक रात्री दहापर्यंत पालघरला पोचणार होते. त्यांच्यापाठोपाठ कृष्णा शेलारचे नातेवाईकही मोखाड्यापर्यंत पोचले होते. माहीमला साकोरा गावातील सुरसे नावाचे पोलिस कर्मचारी या सर्वांची वाट बघत होते.

सर्वच जण भावुक

स्थानिक सोशल मीडियावर तिघांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करणाऱ्या पोस्ट पडत होत्या. किशोरवयीन मुलांच्या शिक्षणासाठी रात्र-पहाट करणाऱ्या आई- वडिलांचे शोकाकुल चेहरे बघताना आता सांत्वन कसे करायचे, या विचाराने शेजारी, नातेवाइकांचेही चेहरे गलबलून गेलेले दिसत होते. शुक्रवारी (ता. ४) त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT