नाशिक

केशव ‘वाचक कट्ट्यावर’ रंगली गाणी, भजनांवर चर्चा

CD
दोन कॉलम -------------- 16242 मालेगाव शहर : येथील केशव वाचनालयात कट्यावर चर्चासत्रात सहभागी रसिक वाचक. ----- केशव ‘वाचक कट्ट्यावर’ रंगली गाणी, भजनांवर चर्चा सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. १७ : येथील सटाणा नाका परिसरातील केशव सार्वजनिक वाचनालय व केशव वाचक कट्ट्याच्या वतीने ‘आपले आवडते गाणे, भजन आणि प्रार्थना’ या विषयावर रंगतदार चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत सहभागी वाचक-रसिकांनी आपल्या आवडत्या गीतांचा, भजनांचा व प्रार्थनांचा परिचय करून देत त्यामागील भावना, विचार आणि आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षस्थानी केशव वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र जहागीरदार होते. यावेळी डॉ. योगेश शास्त्री यांनी नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण व ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या कार्याची माहिती दिली. या चर्चासत्रात ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा’, ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’, ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’, ‘मेरे दिल ने तडपते जब तेरा नाम पुकारा’, ‘मेरे देश की धरती सोना उगले’, ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, यासह विविध चित्रपटगीते, कविता, प्रार्थना आणि भजनांचा उल्लेख करण्यात आला. प्रत्येकाने आपले आवडते गीत किंवा भजन निवडण्यामागील कारण सांगत त्यातील भावार्थ, जीवनमूल्ये आणि वैयक्तिक आठवणी मांडल्या. या चर्चेत संजय पाठक, सतीश कलंत्री, डॉ. सुरेश शास्त्री, स्नेहा शास्त्री, आशिष बोहाडे, रवींद्र महाजन, भगवान बागुल, भरत पोफळे, प्रकाश वडगे, सुरेश कोतकर, हरिप्रसाद गुप्ता, संजय पांडे, रवींद्र मोरे, रमेश उचित, रामनिवास सोनी, गोरख सोनवणे, राजेश पंचारिया, उमा पंचारिया, कल्पना पाटील, योगिता बाविस्कर यांच्यासह रसिक वाचक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT