Assistant Police Inspector Sunil Patil and Tarun along with the psychiatric patient. esakal
नाशिक

Humanity News: खाकी वर्दीचा मनोरुग्णाला आधार! सायखेडा पोलिसांची सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा

चांदोरी : पोलिस म्हटले, की सर्वसामान्य जनता थोडी घाबरते. पोलिसांशी थोडे सुरक्षित अंतर राखूनच राहणे पसंत करते, पण वर्दी खाकी असली तरी ती ही माणसेच आहेत. त्यांनाही नातीगोती असतात.

याचाच सुखद प्रत्यय आणून दिलाय तो सायखेडा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी. (Khaki uniform support for psychiatric patients Social Commitment of Saikheda Police nashik)

नाशिक- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चांदोरी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ५० वर्षीय मनोरुग्ण व्यक्ती फिरत होती. हे सगळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिसत होते, पण काय करणार? वेळेच्या जाळ्यात व आपल्याला काय पडले, म्हणून रोडवर जाणाऱ्या व्यक्ती बघून कानाडोळा करीत होते.

मात्र, आकाश भोज, संदीप जाधव यांनी मनोरुग्णाची माहिती शनिवारी (ता. ७) सकाळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांना दिली.

प्रकाश वाकळे यांनी गोदाकाठ भागातील संकेत खरोटे, विजय गाडे, विजय खालकर, सचिन जपे, गोकुळ बुचुडे, अमोल गोडे, दिलीप गावले, कान्हा ठाकरे, संदीप भोसले, राहुल जरे यांना सोबत घेत त्या मनोरुग्णाला सायखेडा येथे घेऊन गेले.

त्याच्या अंगावरचे कसेबसे कपडे, डोक्यावर केसाच्या जटा झाल्या होत्या. त्यात डोक्यावर मोठी इजा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. डोक्यात एवढी घाण झाली होती, की कात्री केस कापू शकत नव्हती.

मात्र, संकेत खरोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचे केस कापून स्वच्छ अंघोळ घातली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी नवीन कपडे दिले.

मेंढी येथील मधुकर जिते यांच्या निराधार मानसिक रुग्ण व पुनर्वसन केंद्रात त्यांना ठेवण्यात आले. या सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या युवक अन्‌ पोलिसांचे गोदाकाठ भागात कौतुक होत आहे.

"मनोरुग्णाला मदत करताना अनामिक भीती होती. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून माणुसकी दाखवली. त्यामुळे भीती नाहीशी झाली."

-संकेत खरोटे, सोनगाव

"सकारात्मक कामांसाठी युवकांनी पुढे यायला हवे, वैयक्तिक मी स्वतः कायम सोबत असेल."

-सुनील पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, सायखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT