नाशिक

कळवणमध्ये १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणीकपात पाणी अपव्ययावर कारवाईचा इशारा; गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम

CD
कळवणला १६ पासून दहा टक्के पाणीकपात कळवण, ता. ८ : आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करता यावे, यासाठी कळवण नगरपंचायतीने येत्या शुक्रवार (ता. १६)पासून शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात घट झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहराला ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलसंपदा विभाग तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुधारित व निश्चित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती पाहून पुढील टप्प्यात कपातीचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य जलवाहिनी, वितरण नलिका, व्हॉल्व्ह आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याने चारचाकी, दुचाकी धुणे, अंगणात पाणी शिंपडणे किंवा बांधकामासाठी पाणी वापरणे हा अपव्यय मानला जाणार असून, संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोट.. उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून नागरिकांना पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवाव्यात, गळती तातडीने दुरुस्त करावी आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी बचतीसाठी प्रत्येक कुटुंबाचे सहकार्य आवश्यक आहे. - ज्ञागेश येवले, मुख्याधिकारी, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Final List : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीची अंतिम यादी जाहीर; अनेकांचा पत्ता कट, पी. एन. पाटील गटाला धक्का, अनेकजण सतेज पाटलांच्या संपर्कात

India vs Pakistan महामुकाबला! कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात, ८ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा; जाणून घ्या Asia Cup चे वेळापत्रक

लोकं म्हणतील नानाचा मुलगा असा कसा? दुसऱ्या मुलाचा तिरस्कार करायचे नाना, आयुष्यभर मनात राहिली ती सल

Latest Marathi News Live Update : बंगळुरू येथे सीजेपीचे आंदोलन सुरू, आंदोलनात ध्रुव राठी सहभागी

दूध भेसळप्रकरणी सोनई डेअरीवर FDAची कारवाई! सहा दूध नमुन्यांमध्ये डिटर्जंट; १६,७३० लिटर दूध नष्ट

SCROLL FOR NEXT