रब्बीत हरभरा क्षेत्र ५५ हजार हेक्टरवर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : खानदेशात रब्बीची पेरणी रखडत सुरू आहे. पेरणी सुमारे २५ ते २७ टक्के पूर्ण झाली असून, हरभऱ्याची सर्वाधिक सुमारे ५५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खानदेशात यंदा सुमारे पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील कोरडवाहू दादर ज्वारी व कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी सुरूच आहे. ही पेरणी या पंधरवड्यात वेगात सुरू झाली. या महिन्याच्या अखेरिसही कोरडवाहू पिकांची पेरणी सुरू राहणार आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी तापी, अनेर, गिरणा नदीच्या क्षेत्रात सुरू आहे. ही पेरणी जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात होत आहे.
पेरणीत अडथळे
यंदा पेरणी सुरवातीपासून रखडत सुरू आहे. कारण सोयाबीन पिकाची मळणी केल्यानंतर त्यात हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन अनेकांनी केले होते. सोयाबीनची कापणी, मळणी व पुढे शेताची पूर्वमशागत यासाठी वेळ लागला. सणासुदीचे दिवस आहेत. परिणामी पेरणीला विलंब झाला. यामुळे पेरणी रखडत सुरू होती. सध्या गहू पेरणी अपवादानेच सुरू आहे. तसेच हरभऱ्याची पेरणीदेखील कृत्रीम जलसाठाधारक करीत आहेत.
चौकट
कापूस पिकात पेऱणीचे नियोजन
पूर्वहंगामी कापूस पीक काढून त्यात पुढे हरभरा, मक्याची पेरणी, लागवड होईल. यामुळे या पेरणीसंबंधी कापूस पीक काढण्याचे काम सुरू आहे. अनेकांचे कापूस पीक आणखी एक वेचणीनंतर काढले जाईल. यामुळे पेरणीला विलंब होणार आहे किंवा पेरणी डिसेंबरमध्येही होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.