नाशिक

जलसाठा घटला; नद्याही आटल्या

CD
(ही बातमी जागेनुसार कापता येईल) ---- जलसाठा घटला; नद्याही आटल्या खानदेशातील प्रकल्प जलसाठा ६१ टक्क्यांवर स्थिर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : खानदेशातील अनेक मध्यम, लघु प्रकल्प यंदा १०० टक्के भरले नाहीत. फक्त काही प्रकल्प भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्टा, पश्चिम भागातील प्रकल्पांत जलसाठा यंदा मुबलक आहे. पण प्रकल्पांतील जलसाठा मागील दोन महिने उष्णता व उपसा सुरू असल्याने सतत कमी झाला आहे. तलाव व लघु प्रकल्पांतील एकूण जलसाठा ३० टक्क्यांवर आहे. तर, मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा सुमारे ६१ टक्क्यांवर असल्याची माहिती आहे. मागील हंगामात नोव्हेंबरमध्ये प्रकल्पांतील एकूण जलसाठा ८५ टक्क्यांवर होता. खानदेशातील एकूण जलसाठा ६१ टक्क्यांवर स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील अग्नावती, हिवरा, पारोळ्यातील बोरी, चाळीसगावातील मन्याड, एरंडोलातील अंजनी आदी या मध्यम, लघु प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. पण या भागातील लघु तलाव कोरडे आहेत. पावसाळा संपून अर्धा महिना पूर्ण झाला आहे. परंतु खानदेशातील सर्वात महत्त्वाच्या नद्यांत सप्टेंबरपासूनच प्रवाह बंद झाला आहे. त्यात गिरणा, तापी, पांझरा, गोमाई, उदय, वाघूर, पांझरा या नद्यांत पाण्याचा प्रवाह बंद आहे. गिरणा धरणातील जलसाठा यंदा १०० टक्के आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. पण त्यातूनही पाणीवापर सुरूच आहे. यंदा त्यातून रब्बीला फक्त एकच आवर्तन दिले जाणार आहे. तर बिगर सिंचनासंबंधी तीन आवर्तने दिली जातील. चौकट तापीचा प्रवाह ऑक्टोबरमध्येच बंद तापी नदीला प्रवाही पाणीच नाही खानदेशात २०२३ च्या पावसाळ्यात गिरणा नदीला काही दिवस प्रवाही पाणी आले होते. पण मागील वर्षी व यंदाही तापी, गिरणा, वाघूर, पांझरा आदी नद्या डिसेंबरमध्येही प्रवाही होत्या. यंदा तापी नदीचा प्रवाह ऑक्टोबरमध्येच बंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thackeray Photo: फोटो फाडल्याच्या आरोपांवर शायना एनसींकडून स्पष्टीकरण; एकनाथ शिंदेही बोलले...

Pune FDA Action : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग खाऊ गल्लीत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड; नऊ दुकानांच्या तपासणीत सहा व्यावसायिकांवर प्रशासनाची कारवाई

Nagpur News : बोगस शालार्थ आयडी प्रकरणी कान्होलीबारातील शिक्षकाला अटक; सायबर पोलिसांची कारवाई, तीन दिवसाची पोलिस कोठडी

MSC Bank : राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना १६ टक्के वेतनवाढ

Latest Marathi News Live Update : उसाच्या पहिल्या उचलीसाठी सोलापुरात 'स्वाभिमानी' आक्रमक; माढ्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे गाळप पाडले बंद

SCROLL FOR NEXT