shetkari saghtana 11.png 
नाशिक

उद्यापासून देशभरात खरीप स्वातंत्र्य हंगाम.. शेतकरी संघटनेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / कसबे सुकेणे : देशभरातील शेतकऱ्यांना बियाण्यांसह सर्व प्रकारचे उपलब्ध तंत्रज्ञान वापरण्याची मुभा असावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने प्रतिबंधित बियाणे पेरून सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी राज्यात शुक्रवार (ता.12)पासून खरीप हंगाम तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम साजरा केला जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे राज्यध्यक्ष अनिल धनवट यांनी दिली. 

शेतकरी तुरुंगात जायलाही तयार
शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार कोणतीही बियाणे किंवा तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी शेतकरी संघटना अनेक दशकांपासून प्रयत्नशील आहे. दोन वर्षांत हा लढा तीव्र करत एचटीबीटी कपाशीची जाहीर लागवड केली. संबंधित मंत्र्यांना ई-मेल करून जनुक सुधारित बियाण्यांवरील बंदी उठवण्याची मागणी केली. केंद्र शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संघटना या हंगामात जनुक सुधारित कापूस, मका, भात, मोहरी, सोयाबीन, वांगी आदी पिकांची जाहीर लागवड करणार आहे. प्रतिबंधित बियाण्यांची लागवड केली म्हणून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यास शेतकरी तुरुंगात जायलाही तयार असल्याचे धनवट यांनी सांगितले.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हा
 हे आंदोलन महाराष्ट्रासह पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरातमध्येही केले जाणार आहे. शेतकरी जाहीरपणे प्रतिबंधित बियाण्यांची लागवड करणार आहे. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जाहीरपणे लागवड करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, प्रांतिक उपाध्यक्ष देवीदास पवार, विभागीय अध्यक्ष संतू पाटील-झांबरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख संध्या पगारे, शंकर पुरकर, तानाजी झाडे, आनंद सादडे, त्र्यंबक चव्हाणके, निफाड तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोंबले आदींनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT