Police action esakal
नाशिक

मोसम नदीकाठावरील हातभट्ट्या उद्‌ध्वस्त; जायखेडा पोलिसांच्या कारवाईचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

अंबासन/ अंतापूर : मोसम नदीकाठावर बिनबोभाट सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर जायखेडा पोलिसांनी सायंकाळी गुप्त माहितीच्या आधारावर अचानक छापा टाकून दोन हातभट्टी चालकांविरुद्ध कारवाई केली. मोसम परिसरातील गावठी हातभट्ट्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. (Latest Marathi News)

गेल्या अनेक दिवसांपासून मोसम नदीपात्रातून पुरपाणी खळखळून वाहत आहे. यातच नदीकाठावरील हिरव्यागार झाडांचा आडोसा घेऊन काही गावठी हातभट्टी चालविणाऱ्यांनी हातभट्ट्या बिनबोभाट सुरू केल्या होत्या. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांना गुप्त माहितीच्या आधारावर सुगावा लागताच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गोपीनाथ भोये, पोलिस शिपाई जितेंद्र पवार यांनी मोसम नदीवरील धोबी घाटात शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकला.

यात नदीकाठावर हातभट्टी सुरू असल्याचे निदर्शनास येताच उपनिरीक्षक रसाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घेराव घालून रोहिदास बारकू सोनवणे (वय ३०) व नायबू अभिमन मोरे (वय २८, दोघे रा. ताहाराबाद) यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कच्चे रसायन व तयार दारू असा एकूण सात हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जायखेडा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्या चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, यापुढील काळात हातभट्ट्यांवर कठोर कारवाईचे संकेत जायखेडा पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

''मोसम नदीकाठाजवळ अवैध हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच कार्यवाही केली आहे. परिसरातील बिनबोभाट अवैध हातभट्ट्यांवर अशीच कारवाई केली जाईल.'' - श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT