...तर किनगावला अनुचित प्रकार घडला नसता
धनंजय चौधरी : किरीट सोमय्यांकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३१ : किनगाव येथे ‘आरएसएस’ची या मार्गावरून पदयात्रा निघणार होती. तो मार्ग बदलविण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांनी तसे केले नाही. पदयात्रा निघण्याअगोदरच दोनशे पोलिसांचा ताफा गावात होता. पदयात्रेला ऐनवेळी परवानगी देण्यात आली होती. ‘आरएसएस’ला वाचविण्यासाठी पदयात्रेच्या मार्गावर असलेल्या नागरिकांवर लाठीमार पोलिसांनी केला. यामुळे वातावरण बिघडले असल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
माजी खासदार किरीट सोमय्या व भाजप दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही श्री.चौधरी यांनी केला. किनगाव (ता. यावल) सामाजिक सलोखा पाळणारे गाव आहे. हिंदू, मुस्लिम समाजबांधव एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात. मात्र त्यात तेढ निर्माण करण्याचे काम सोमय्यांनी केले आहे. या प्रकरणात केवळ एकाच समाजाच्या नागरिकांवर गुन्हे दाखल आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, राहुल भालेराव आदी उपस्थित होते.
चौकट
सोमय्यांकडून दुष्काळ बेदखल
जळगाव जिल्ह्यात दुष्काळ आहे. शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, एमआयडीसीचा प्रश्न आहे. अशा अनेक समस्या असताना माजी खासदार सोमय्या केवळ किनगावच्या घटनेबाबत बोलतात. इतर प्रश्न त्यांना दिसत नाही का, असा सवालही श्री चौधरी यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.