नाशिक

दंगेखोरांवर कठोर कारवाई करा

CD
NSK26H33860 जळगाव : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देताना सकल हिंदू समाजाचे बांधव. ------ किनगाव घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सखोल चौकशीची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२९ : किनगाव (ता. यावल) येथे विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलनादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संबंधित समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. किनगाव येथे २५ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला पोलिस विभागाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, या पथसंचलनादरम्यान काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण करून तणावाची परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, या घटनेनंतर समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याबाबतही निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी. घटनेशी संबंधित सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना महामंडलेश्वर जनार्दन महाराज, श्‍यामचैतन्य बापू (पाल आश्रम), गजानन महाराज वरसाळेकर, वेदमूर्ती श्रीराम महाराज जोशी, योगेश्वर गर्गे (प्रांत मंत्री विहिंप), प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हा कार्यवाह हितेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष विहिंप हरीश मुंदडा, जिल्हा मंत्री राकेश लोहार, उज्ज्वल चौधरी महानगर कार्यवाह, हरीश कोल्हे, बंटी नेरपगारे, राजेंद्र गांगुर्डे व समस्त सकल हिंदू समाजातर्फे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ------- चौकट ‘घटनेमागील कारणांची शोध घ्या’ किनगाव घटनेमागील नेमकी कारणे, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओंची सत्यता यांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

Pune News: मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पात निकृष्ट काम; ठेकेदाराचा खुलासा पुणे महापालिकेने फेटाळला

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Madha Politics: माढ्याची खासदारकी राष्ट्रवादीला सोपी! पदवीधरच्या निकालाचा परिणाम; दोन आमदार पक्षासोबत तर दोन भाजपच्या जवळ

SCROLL FOR NEXT