नाशिक

दुष्काळाच्या छळांनी शेतकर्याची आत्महत्या

CD
NSK26H32295 : ज्ञानेश्वर सपकाळे --- कर्जबाजारी शेतकऱ्याची किनोद येथे आत्महत्या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : शेती व घराचे कर्ज. त्यात दुष्काळामुळे हातचे पीक वाया जात असल्याने ज्ञानेश्वर बाबूराव सपकाळे (वय ३५, रा. किनोद, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. १३) किनोद येथे घडली. किनोद येथील शेतकरी ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यावर सहकारी संस्थेचे कर्ज आहे, तसेच शेतीसाठी उसनवारीने काही रक्कम घेतली असून, घरासाठी गृहकर्ज घेतले आहे, अशी माहिती किनोद येथील रहिवाशांनी दिली. शेतामध्ये कपाशीची लागवड केली असून, चांगले पीक आले, की कर्ज फेडू या विचारात ते होते. मात्र, यंदा दुष्काळी स्थितीमुळे हातचे पीक वाया जात असल्याचे पाहून ते खचले. त्यामुळे ते सतत चिंतेत राहत होते. मंगळवारी पत्नी शेतात गेली असताना, त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT