kisan rail esakal
नाशिक

शेतकऱ्यांनो..किसान रेलबाबत महत्वाची माहिती

विनोद बेदरकर

नाशिक : शेतमाल देशभरात विक्रीसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून किसान रेल (kisan rail) सुरू केली होती. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकातून मुजफ्फरपूर (बिहार) मार्गावर पहिली किसान रेल सुरू झाली. सुरवातीला आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या रेल्वेला शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे फेऱ्या वाढल्या. किसान रेल आठवड्यातून मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी या तीन दिवशी सुरू झाली होती. पण आता किसान रेलबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

‘किसान रेल’ आता आठवड्यातून चार दिवस

देशातील पहिली ‘किसान रेल’ (kisan rail) सुरू होण्यास सोमवारी (ता. ९) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात किसान रेल्वेद्वारे जिल्ह्यातून १६ हजार ५०० टन शेतीमाल परराज्यात पाठविण्यात आला, तर भुसावळ विभागातून किसान रेलला सुमारे १६ कोटींचा महसूल मिळाला. कृषिमाल वाहतुकीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आठवड्यातून तीन दिवस धावणारी किसान रेल आता सोमवार (ता. १६)पासून आठवड्यातून चार दिवस धावणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे (hemant godase) यांनी दिली. वर्षभरात भुसावळ विभागातून २६ हजार टन शेतमाल परराज्यात किसान रेलमधून पाठविण्यात आला. यापोटी शासनाला नऊ कोटी १६ लाख रुपयांचा महसूल मिळाला.

शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे फेऱ्या वाढल्या

देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकातून पाच हजार टन शेतमालाची वाहतूक झाली. त्यातून शासनाला दोन कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून सहा हजार टन, तर मनमाड रेल्वेस्थानकावरून साडेपाच हजार टन शेतमाल परराज्यात पाठविण्यात आला. यातून शासनाला नाशिक आणि मनमाड येथून चार कोटी ५० लाख रुपयांचा महसूल मिळाला. शेतकऱ्यांकडून किसान रेलला मिळणारा प्रतिसाद पाहता किसान रेल आठवड्यातून तीनऐवजी चार दिवस सुरू करावी, अशी मागणी काही दिवसांपासून खासदार गोडसे करीत होते. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, येत्या सोमवारपासून किसान रेल आठवड्यातून चार दिवस धावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT