Kisan Railway  e-sakal
नाशिक

नाशिक : ‘किसान रेल’ आता आठवड्यातून चार दिवस धावणार

विनोद बेदरकर

नाशिक : देशातील पहिली ‘किसान रेल’ सुरू होण्यास सोमवारी (ता. ९) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात किसान रेल्वेद्वारे जिल्ह्यातून १६ हजार ५०० टन शेतीमाल परराज्यात पाठविण्यात आला, तर भुसावळ विभागातून किसान रेलला सुमारे १६ कोटींचा महसूल मिळाला. कृषिमाल वाहतुकीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आठवड्यातून तीन दिवस धावणारी किसान रेल आता सोमवार (ता. १६)पासून आठवड्यातून चार दिवस धावणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

शेतमाल देशभरात विक्रीसाठी खासदार गोडसे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून किसान रेल सुरू केली होती. देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकातून मुजफ्फरपूर (बिहार) मार्गावर पहिली किसान रेल सुरू झाली. सुरवातीला आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या रेल्वेला शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे फेऱ्या वाढल्या. किसान रेल आठवड्यातून मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी या तीन दिवशी सुरू झाली होती. वर्षभरात भुसावळ विभागातून २६ हजार टन शेतमाल परराज्यात किसान रेलमधून पाठविण्यात आला. यापोटी शासनाला नऊ कोटी १६ लाख रुपयांचा महसूल मिळाला.

देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकातून पाच हजार टन शेतमालाची वाहतूक झाली. त्यातून शासनाला दोन कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून सहा हजार टन, तर मनमाड रेल्वेस्थानकावरून साडेपाच हजार टन शेतमाल परराज्यात पाठविण्यात आला. यातून शासनाला नाशिक आणि मनमाड येथून चार कोटी ५० लख रुपयांचा महसूल मिळाला. शेतकऱ्यांकडून किसान रेलला मिळणारा प्रतिसाद पाहता किसान रेल आठवड्यातून तीनऐवजी चार दिवस सुरू करावी, अशी मागणी काही दिवसांपासून खासदार गोडसे करीत होते. गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, येत्या सोमवारपासून किसान रेल आठवड्यातून चार दिवस धावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Baramati News : बारामतीच्या अथर्व पवार यांची केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेत उत्तुंग कामगिरी

Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

Pune Airport Security : वाढत्या बांधकामांमुळे हवाई सुरक्षेचे आव्हान वाढले; ना-हरकत प्रमाणपत्र घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT