नाशिक

चॉपर-चाकूने हाणामारी; दोन्ही गटांतील सात जणांवर गुन्हे विनयभंगाच्या जाबावरून वाद चिघळला; परस्परविरोधी तक्रारी दाखल

CD
जाब विचारल्याचा वादातून चाकूहल्ला पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील सात जणांवर गुन्हे दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२३ : महिलेचा विनयभंग केल्याचा जाब विचारल्याने सुरू झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. या वेळी चॉपर आणि चाकूने वार करून एकमेकांना दुखापत करण्यात आल्याची घटना गुरुवारी (ता. २२) दुपारी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. या प्रकरणी दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारींवरून सात जणांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी रस्त्यावरून जात असताना संशयिताने मागून जोरात धक्का देत तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले. या प्रकाराबाबत महिलेच्या भावाने जाब विचारला असता, ‘यापूर्वी तुम्ही मला मारहाण केली होती, म्हणून मी तुम्हाला त्रास देत आहे,’ असे म्हणत संशयितांसह चौघांनी महिलेला आणि तिच्या भावाला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने चॉपरने दोघांवर वार करून त्यांना दुखापत केली तसेच धमकाविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संशयित विनोद सोनवणेसह चौघांविरोधात विनयभंगासह अन्य आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे तपास करीत आहेत. दुसऱ्या गटाचीही तक्रार दरम्यान, दुसऱ्या गटातील विनोद सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना मागील भांडणाच्या कारणावरून संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने हातातील चाकूने त्यांच्या गालावर वार करून दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची पोत खाली पडून नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी संशयित लुबेश केदार यांच्यासह तिघांविरोधात दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक कैलास इंगळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT