नाशिक

कोसुर्डे सांडव्याच्या कामावर विभागाची कारवाईकडे नजर! थातूरमातूर दुरुस्ती नको; दो

CD
कोसुर्डे सांडव्याचे काम निकृष्ट थातूरमातूर दुरुस्ती नको; दोषींवर कारवाईची मागणी कळवण, ता. १६ ः कोसुर्डे लघुपाटबंधारे प्रकल्पावरील सांडव्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता संबंधित विभागाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ३७ लाख रुपये खर्चून उभारलेल्या सांडव्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत यापूर्वी आवाज उठवूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने आदिवासी बांधवांत नाराजी आहे. सांडव्याच्या बांधकामाला तडे जाणे, काँक्रिटचा थर उखडणे, बांधकामाखाली पोकळ्या निर्माण होणे, दगड व खडी उघडी पडणे यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असून, लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही कामाची अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाने थातूरमातूर दुरुस्ती करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून, बांधकामाचे साहित्य, कामाची मोजमापे, मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक निकष आणि प्रत्यक्ष खर्चाची तपासणी करावी. दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याची अनामत रक्कम जप्त करावी तसेच संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी होत आहे. विकासकामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र, कामे निकृष्ट दर्जाची होत असतील तर त्याचा फटका नागरिक व शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ........... कोट.... कोसुर्डे सांडव्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत होतो. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शासनाकडून निधी उपलब्ध झाला. त्यामुळे ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण होते. मात्र, कामाचा दर्जा निकृष्ट असून, दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा काही वर्षांतच बांधकाम खराब होणार असेल, तर इतका निधी खर्च करण्याचा उपयोग काय, त्यामुळे केवळ वरवरची दुरुस्ती न करता संपूर्ण कामाची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी. लक्ष्मण पवार, ग्रामस्थ, कोसुर्डे ..... कोसुर्डे लघुपाटबंधारे प्रकल्पावरील सांडव्याच्या कामाबाबत झालेल्या तक्रारींची पाहणी केली असून, आवश्यक तपासणी करण्यात येईल. मंजूर अंदाजपत्रक आणि कामाच्या निकषांनुसार बांधकाम झाले की नाही, याची पडताळणी करून तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. पी. डी. सोनवणे, उपकार्यकारी अभियंता, सटाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT