नाशिक

कोतवाल पदासाठी ३०३९ उमेदवार पात्र

CD
३६-२ कोतवाल पद भरतीसाठी तीन हजार ३९ जण पात्र --------------- लेखी परीक्षा १५ नोव्हेंबरपासून होणार ---------- नाशिक, ता.३ ः ः जिल्हा प्रशासनामार्फत कोतवाल पदासाठी राबविण्यात येत असलेल्या भरतीपक्रियेत ४ हजार ६० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी ३ हजार ३९ उमेदवार पात्र ठरले असून १ हजार २१ जणांचे अर्ज अपात्र ठरले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे यांनी दिली. जिल्ह्यात पंधरा तालुक्यात कोतवालांच्या १५६ रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तब्बल ४ हजार ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एका पदासाठी साधारणत: २६ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. सुरगाण्यातील सर्वाधिक ४५७ उमेदवार पात्र ठरले. नाशिक तालुक्यातून सर्वाधिक ५२५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १६९ अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांच्या याद्या तहसील व प्रांत कार्यालय, पोर्टलवर व एनआयसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. पात्र उमेदवारांची यांची लेखी परीक्षा १५ नोव्हेंबरला होणार आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र गुुरुवार (ता.५) ते मंगळवारपर्यंत (ता.१०) डाउनलोड करून घेता येतील. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र व ओळखपत्राची मूळ प्रत घेऊन प्रवेश करता येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. --- कोट पात्र उमेदवारांची पुढील निवड प्रक्रिया पारदर्शकपणे व शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येईल. भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याची माहिती प्रशासनामार्फत अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी. --- १६-१ तालुकानिहाय पात्र अर्ज इगतपुरी : १८२, कळवण ३३४, चांदवड ११२, देवळा ७९, दिंडोरी २७९, नांदगाव ९८, नाशिक १६९, निफाड १४१, पेठ १६५, बागलाण ३८७, मालेगाव २२३, येवला १८०, सुरगाणा ४५७, सिन्नर १३४, त्र्यंबकेश्वर ९९.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

Tukaram Mundhe: ''तुम्हाला चांगलं अन्न नकोय का?'' असं का म्हणाले तुकाराम मुंढे? मंत्र्यांना मुंढे का नकोसे वाटतात? दिलं उत्तर...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

MPSC Exam Inquiry: एमपीएससीच्या नऊ परीक्षांची चौकशी; राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ यादीतून वगळल्याने विद्यार्थ्यांचा सवाल

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

SCROLL FOR NEXT