फोटो : H32537
नाशिक : क्रांतिसूर्य वाचनालयाचे उद्घाटनप्रसंगी मान्यवर.
---
धात्रक फाटा येथे क्रांतिसूर्य
वाचनालयाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन (प्रतिष्ठाण) व शिल्पकार सामाजिक, शैक्षणिक बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे धात्रक फाटा येथे क्रांतिसूर्य सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका व बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन झाले.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देणे आणि बालकांमध्ये चांगले संस्कार रुजविणे, या उद्देशाने वाचनालय, अभ्यासिका व बाल संस्कार केंद्र सुरू केले आहे. ‘वाचा, शिका, विचार करा, परिवर्तन घडवा’ हा संदेश या उपक्रमातून दिला आहे. या कार्यक्रमाला नगरसेवक अॅड. नामदेव शिंदे, नगरसेवक रिद्धेश निमसे, नगरसेविका ऐश्वर्या जेजुरकर, इंदूबाई खेताडे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे ट्रस्टी नितीन भुजबळ आणि सामाजिक कार्यकर्ते बीएमए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन अढांगळे ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन व शिल्पकार विचार मंचातर्फे करण्यात आले होते. समाजाप्रति आपलेही काही देणे लागते या भावनेतून या वाचनालयाची वास्तू येथील निवृत्त उत्तमराव तेलोरे, शांताराम बागूल व राजेंद्र बर्वे यांनी स्वखर्चातून उभी करून समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे सांगत मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. संजय डावरे, अभिजित गांगुर्डे, ॲड. सुधाकर अहिरे, ॲड. साहेबराव गांगुर्डे, राहुल सम्राट यांचे व कमिटीचे समाजबांधवांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.