नाशिक

विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा

CD
दोन कॉलम -- विभागीय क्रीडा स्पर्धेत हजार विद्यार्थ्यांचा सहभाग (उपशीर्षक) निवड चाचणी स्‍पर्धेला सुरवात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत ''विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावच्‍या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने आयोजित स्‍पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आजपासून सुरवात झाली असून १९ नोव्हेंबरपर्यंत स्‍पर्धा होईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.१८) नगरसेवक विशाल भोळे यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. याप्रसंगी नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ उपकुलसचिव डॉ. प्रमोद पाटील, जीएमसीचे अधिष्‍ठाता डॉ. गिरीश ठाकूर अधिष्ठाता, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. दिलीप दिघे, सॉफ्टबॉल असोसिएशनचे राज्य सचिव डॉ. प्रदीप तळवलकर, ॲथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव राजेश जाधव, कबड्डी असोसिएशन सहसचिव नितीन बरडे आदी उपस्थित होते. शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाचे सत्र अधिष्ठाता डॉ. पराग भागवत, अधिष्ठाता डॉ. संतोष चव्हाण, उपकुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ डॉ प्रमोद पाटील आणि मुख्य समन्वयक डॉ. अर्चना काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे नियोजन केले आहे. एक हजार विद्यार्थी सहभागी विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेत कबड्डी, खो- खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि ऍथलेटिक्स यासारख्या विविध खेळांचा समावेश आहे. या क्रीडा स्पर्धेत जिल्‍ह्यातील विविध शासकीय होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक, डेंटल, नर्सिंग फिजियोथेरपी, युनानी महाविद्यालयांमधील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ४ हजार किमी चालावं लागेल'; राहुल गांधींनी नेमका कुणाला लगावला टोला? वाचा...

Killedharur News : कृषी उत्पन्न बाजार समितीतील ३१ भूखंडाची लिलावा प्रक्रिया पारदर्शक व्हावी; संचालक संदीप शिनगारे यांचे सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू

Andaman Festival : लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेने अंदमानमध्ये गाजवला नृत्यकलेचा ठसा; आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात प्रथम क्रमांक

Pachod News : तब्बल ४८ तासानंतर आर्यन उर्फ आयुषचा मृतदेह आढळला; श्यामचा शोध सुरूच..!

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

SCROLL FOR NEXT