krishithon esakal
नाशिक

Nashik Krishithon 2023: नाशिकमध्ये 23 नोव्हेंबरपासून ‘कृषिथॉन’; कर्तबगारांचा पुरस्काराने होणार सन्मान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Krishithon : आजची युवा पिढी अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्या प्रयोगशीलतेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतातील अग्रगण्य ‘कृषिथॉन’ प्रदर्शनाच्या व्यासपीठावरून विविध श्रेणींत कार्य करणाऱ्या कर्तबगारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

यात ‘प्रयोगशील युवा कृषी संशोधक, युवा कृषी उद्योजक, कृषीविस्तार कार्य, युवा शेतकरी पुरस्कार’ (पुरुष गट) अशा चार गटांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष संजय न्याहारकर यांनी दिली. (Krishithon from November 23 in Nashik news)

नाशिक ठक्कर्स मैदान येथे २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या १६ व्या कृषिथॉन प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारात डॉ. अश्विनी चंदनसिंह चंदेल (परभणी), डॉ. गिरीश हिरामण जगदेव (धुळे), डॉ. गणेश शेंडगे (सातारा), डॉ. योगेश नाना पाटील (छत्रपती संभाजीनगर), डॉ. कुणाल धनंजय माहोरकर (अमरावती), डॉ. अश्विनी प्रशांत बेनके (राजगुरूनगर), डॉ. पल्लवी जगन्नाथ महाजन (पुणे), डॉ. उदय पवार (मालेगाव), डॉ. रश्मिका कुंभार (सातारा), डॉ. प्रियांका रमेश ब्राह्मणे (नाशिक) यांची निवड झालेली आहे.

प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कारासाठी अक्षय कावळे आणि अक्षय वैराळे (अकोला), संतोष वसंत जाधव (सांगली), निखिल संजय पाटील (नाशिक), प्रवीण रामराव मोगल (निफाड), कमलेश नानासाहेब घुमरे (मालेगाव), रितेश भाऊसाहेब पोपळघाट (पुणे), स्वाती सोपान कबाडी (पुणे), प्रतिभा किरण सानप (छत्रपती संभाजीनगर), छाया दीपकराव देशमुख-मोरे (अमरावती), शरयू शांताराम लांडे (पुणे) यांची निवड झाली आहे.

प्रयोगशील कृषी विस्तार कार्य पुरस्कारासाठी अतुल पोपटराव माने-पाटील (सोलापूर), पंकज धोंडप्पा मस्के (मंगळवेढा), योगेश नामदेव धनगर (बारामती), सूर्यकांत बाबूराव लोखंडे (लातूर), अण्णासाहेब संजाबराव जगताप (हिंगोली), रूपाली प्रशांत लोखंडे (नाशिक), मनीषा श्रीराम लांडे (अमरावती), मोहिनी राजेंद्र पुनसे (चंद्रपूर) यांची निवड झाली आहे. प्रयोगशील युवा शेतकरी (पुरुष) गटात भागीनाथ बाबासाहेब आसणे (अहमदनगर), महेश पांडुरंग आसबे (सोलापूर), निखिल मधुकरराव टेटू (तिवसा), किरण मनोहरराव इंगळे (अमरावती), राहुल पोपट पवार (पुणे), दर्शन रावसाहेब आहेर (देवळा), अंकित किरण वाघ (निफाड), प्रमोद दशरथ पाचवे (सिन्नर), मंगेश प्रतापराव देशमुख (परभणी), मिथिलेश हरिश्चंद्र देसाई (रत्नागिरी), धैर्यशील रणधीर पाटील (सांगली), जितेंद्र पोपट पवार (साक्री), योगेश विनोद खानझोडे (वाशीम) यांची निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup विजेत्या लेकीच्या कामगिरीने वडिलांची शिक्षा होणार माफ; ‘क्रांती’ ठरतेय कुटुंबाच्या आनंदाचं कारण

Mali Violence: मालीमध्ये अल-कायदा आणि आयसिसचा दहशतवाद! ५ भारतीयांचे अपहरण अन्...; नेमकं काय घडलं?

'या' दिवशी बोहोल्यावर चढणार सुरज चव्हाण; कुठे आहे लग्न? उरलेत काहीच दिवस; समोर आली अपडेट

ED seizes properties of Congress MLA : मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस आमदाराची कोट्यवधींची मालमत्ता ’ED’कडून जप्त!

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील सोसायटीतील लिफ्ट अचानक कोसळली

SCROLL FOR NEXT