नाशिक

कृष्णा चांदगुडे यांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान

CD
फोटो : H31393 कृष्णा चांदगुडे यांना कार्यगौरव पुरस्कार प्रदान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना भटके विमुक्त समाजाचा कार्यगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. राज्यभर कार्यरत असणाऱ्या भटका विमुक्त शोषित समुदाय संघर्ष संघटनेतर्फे या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुणे येथे सानेगुरुजी स्मारक येथे झालेल्या समारंभात नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे अतिरिक्त आयुक्त प्रमोदकुमार पवार, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू अशोक महाजन यांच्या हस्ते चांदगुडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जातपंचायतीच्या मनमानीविरोधातील केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. कृष्णा चांदगुडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह आहे. जातपंचायतीच्या विरोधातील लढ्यामुळे २०१६ ला राज्य सरकारने ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला. त्यात चांदगुडे यांचा प्रमुख सहभाग होता. चांदगुडे यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजी जोशी, लेखक नारायण भोसले, ॲड. अरुण जाधव हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Kolhapur DCC Bank Election : गोकुळपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी; 732 ठराव रद्द, कोणत्या गटात किती मतदार?

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याच्या याचिकेवर अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

SCROLL FOR NEXT