नाशिक

कृष्णा, ग्रिफीन, एसएसके, क्रीडक गट विजेते

CD
फोटो : H33213, H33214, H33215, H33216 ------------- कृष्णा, ग्रिफीन, एसएसके, क्रीडक गट विजेते एनडीसीए मान्सून लीग क्रिकेट स्‍पर्धेतील कामगिरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २१ : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १९ वर्षाआतील वयोगटातील मॉन्सून लीग क्रिकेट स्पर्धेतील बी डिव्हिजनमधील सामन्यांत कृष्णा, ग्रिफीन, एसएसके व क्रीडक क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळवले. या स्‍पर्धेत विविध संघांकडून खेळाडूंची चमकदार कामगिरी केली आहे व अ गटातील कै. शिवाजीराव कातकाडे स्मृति चषक स्पर्धेत प्रवेश केला. बी डिव्हिजनमध्ये एकूण १६ संघांत ४ गटात प्रत्येक संघाला मर्यादित २५ षटकांच्या स्वरूपात प्रत्येकी ३ साखळी सामने खेळविले. कृष्णा, ग्रिफीन, एएसके व क्रीडक क्रिकेट अकादमी या संघांनी आपले तिन्ही साखळी सामने जिंकले. यास्पर्धेत फलंदाजीत कृष्णा क्रिकेट अकादमीचा वेदांत गिरी, ग्रिफीनचा कृष्णा गोवर्धने, एसएसकेचा झुनेद अन्सारी यांनी शतके झळकवली. गोलंदाजीत कृष्णाचा तनिष्क खेडकर, क्रीडकचा चैतन्य बागूल व ग्रिफीनचा आदित्य विश्वकर्मा यांनी एका सामन्यात प्रत्येकी ५ बळी घेत विशेष चमक दाखवली. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, महात्मा नगर व एसएसके मैदान येथे हे सामने खेळवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT