ध्वजारोहण सोहळा विशेष पुरवणी
--
गोदापूजनाचा अलौकिक, अविस्मरणीय सोहळा
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केले असून, त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार करत त्र्यंबकेश्वरला येण्याचे जाहीर केल्यामुळे त्र्यंबकवासीयांना अत्यानंद झाला आहे. त्यांच्या आगमन सोहळ्याची व ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर त्र्यंबकेश्वरला येत असल्याने त्यांचे स्वागत करताना मनात आनंद तर आहे; पण शब्दांमधे व्यक्त न करण्यासारखा हा सोहळा असणार आहे.
-त्रिवेणी तुंगार, नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर नगरी सज्ज झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दहा शैव आखाड्यांचे साधु-महंत, ठाणापती यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा कुशावर्त तीर्थावर होत आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, आमदार, खासदार, स्थानिक नगरसेवक, प्रशासन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने शुक्रवारी (ता. ३०) त्र्यंबकेश्वर शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. कुशावर्त तीर्थापासून त्र्यंबकराज मंदिर, पालिकेपर्यंत शोभायात्रा असेल. दुपारी चारला या शोभायात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा.
त्र्यंबकेश्वर पालिकेने ग्रामसभा घेऊन काही ठराव पारित केले आहेत. त्या ठरावांची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. दर्शनपथाच्या कामानिमित्त स्थानिकांची घरे, व्यावसायिकांचे गाळे पाडल्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शासनाने नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदत केली पाहिजे, अशी आम्ही विनंती केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच त्र्यंबकेश्वरला भेट देत येथील साधु-महंतांचे आशीर्वाद घेतले. स्थानिकांना मदतीचे आश्वासन त्यांनी दिले असून, शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांची ख्याती असल्यामुळे त्र्यंबकवासीयांना त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे.
---
त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलेल
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहराच्या विकासात भर पडत आहे. दर्शनपथाची कामे प्रगतिपथावर आहेत. मंदिर परिसरातील शासकीय रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय पाडले असून, उर्वरित कामे सुरू आहेत. त्र्यंबकेश्वरला नवीन रुग्णालय मिळणार आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी येत असल्याने त्या इमारतीचे काम आता जोमाने सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर शहराचा चेहरामोहरा बदलेल, असा मला पूर्णपणे विश्वास वाटतो.
...
पारंपरिक वाद्य, शंखनाद
ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. यात पारंपरिक वाद्य व आदिवासी नृत्य असेल. कुशावर्त तीर्थावर शंखनादही होणार असल्याने हा ध्वजारोहण सोहळा वेगळा ठरेल. आजवरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा हा २०२७ चा सिंहस्थ अगदी भिन्न व संस्मरणीय ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या या सिंहस्थानिमित्त देश-विदेशातील भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनाचा लाभ घेतील.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.