नाशिक

कुंभमेळ्यात भाविकांना अखंडीत वित्तीय सुविधा

CD
कुंभमेळ्यासाठी बँकिंग यंत्रणा सज्ज रोख मर्यादा वाढणार; मोबाईल एटीएम, डिजिटल व्यवहार आणि बँकिंग सेवांचा विस्तार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : सिंहस्थ महाकुंभमेळ्यात लाखो भाविक, पर्यटक आणि नागरिकांना अखंडित वित्तीय सेवा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यातील रोख तसेच डिजिटल बँकिंग व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी रोख मर्यादा वाढविणे, मोबाईल एटीएमची सुविधा उपलब्ध करणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बँकर्स समितीची उच्चस्तरीय बैठक झाली. भारतीय रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग आणि विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकच्या वित्तीय व पायाभूत सुविधांच्या आवश्यकतांचे सादरीकरण केले. कुंभमेळ्याच्या वित्तीय व्यवस्थेचा अंतिम आराखडा निश्चित करण्यासाठी शुक्रवारी (ता. ९) आरबीआयच्या पुढाकाराने सर्व बँकांची विशेष बैठक होणार आहे. यात रोख पुरवठा, एटीएम, मोबाईल एटीएम, कॅश चेस्ट आणि डिजिटल व्यवहारांच्या सुविधांचे अंतिम नियोजन केले जाईल. रोख मर्यादा वाढणार नाशिकची सध्याची सुमारे ६ हजार कोटी रुपयांची रोख मर्यादा वाढविण्यासाठी आरबीआय बेलापूरकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यातील वाढीव रोख मागणी लक्षात घेऊन बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. कुंभमेळा क्षेत्रातील वाहनतळ, साधुग्राम, प्रमुख नदीघाट आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी मोबाईल एटीएम वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. डिजिटल व्यवहारांवर भर लहान विक्रेते, वाहतूक सेवा पुरवठादार आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये पीओएस यंत्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यूपीआय व्यवहारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यात येतील. दुर्गम आणि गर्दीच्या भागात बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी बँकिंग कॉरस्पाँडंटचे जाळेही विस्तारण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT