पान-३-- फोटो जिल्हाधिकारींचा वापरणे
----------
३६-४
गर्दी व्यवस्थापन, विकासकामे वेळेत पूर्ण करणार
ध्वजारोहण सोहळ्यातील उणिवांवर चर्चा ः अधिकारी-लोकप्रतिनिधी संवादावर भर
-------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यातील काही उणिवांमुळे स्थानिकांसह बाहेरुन आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागला. ही बाब विचारात घेता आगामी कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, प्रवेश पास वितरण, पायाभूत सुविधा आणि विकासकामांची वेळेत पूर्ततेवर विशेष भर देण्याचा निर्धार करण्यात आला. त्यादृष्टीने परस्पर समन्वय व सामंजस्यातून कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश यंत्रणांना देण्यात आले.
त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी (ता.५) ध्वजारोहण सोहळा विचारमंथन बैठक झाली. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपनगराध्यक्षा पल्लवी शिरसाट, अपर पोलिस अधीक्षक एम. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे आदी उपस्थित होते.
खासदार वाजे म्हणाले, सिंहस्थात भाविकांना व स्थानिक नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. आमदार खोसकर यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगत यंत्रणांचे कान टोचले. त्रिवेणी तुंगार यांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरातील विकासकामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सर्व विभागांनी त्यांच्या कामांचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश दिले. डॉ. स्वामी यांनी आगामी कुंभमेळ्यातही सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या दृष्टीने समन्वय महत्त्वाचा राहणार असल्याचे सांगितले. तहसीलदार गणेश जाधव यांनी ध्वजारोहण सोहळ्याच्या आयोजनाची माहिती दिली. महसूल, महावितरण, कृषी, पोलीस, पुरातत्व, प्रादेशिक परिवहनसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होतेे.
---
१६-१
बैठकीत या मुद्यांवर मंथन
- प्रलंबित विकासकामांना गती देणे
- प्रवेश पास वितरण अधिक सुलभ करणे
- प्रवेशासाठीच्या याद्यांची पडताळणी करावी
- शहरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन देणे
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.