नाशिक

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण

CD
पान एक फोटो - ३३१७३ सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा नजराणा भेट सकाळ वृत्तसेवा नवी दिल्ली/नाशिक, ता. २१ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याचे उद्‍घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होत आहे. ध्वजारोहण सोहळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अधिकृत निमंत्रण बुधवारी देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनामध्ये बुधवारी (ता. २१) निमंत्रण देण्यात आले. शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा व कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, महापौर हिमगौरी आहेर-आडके, त्र्यंबक नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने उपस्थित होते. कुंभ प्राधिकरण संकेतस्थळाचे उद्‍घाटन ध्वजारोहणासोबतच ३१ ऑक्टोबरला गोदा महाआरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्‍घाटन, कुंभ गीताचे लोकार्पण, कॉफीटेबल बुक आणि विशेष टपाल तिकिटाचे अनावरण या कार्यक्रमांसाठीही राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले आहे. पंचेंद्रियांचा अनुभव देणारे निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यात आलेले निमंत्रण केवळ पत्र नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी कलाकृती आहे. निमंत्रणाची पेटी उघडताच कुंभमेळ्याची पौराणिक कथा आणि आध्यात्मिक माहात्म्य सांगणारी त्रिमितीय पॉप-अप कलाकृती समोर येते. यात दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श या पंचेंद्रियांना अनुभव देता येईल, अशी संकल्पना मांडण्यात आली आहे. गोदावरीचा महिमा आणि कुंभाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. भेटवस्तू संचात महाराष्ट्राची ओळख विशेष भेटवस्तू संचात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण वारशाचे दर्शन घडविणाऱ्या कलाकृती आहेत. आदिवासी विकास विभागाच्या ‘शबरी नॅचरल्स’च्या उत्पादनांचा यात समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून बनविलेले पदार्थ, मोहफुलांपासून बनविलेली उत्पादने, बांबूच्या वस्तू आणि वनमध यातून आदिवासींचे पारंपरिक ज्ञान आणि उद्योजकतेचे दर्शन घडते. तर महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा मानबिंदू असलेल्या येवला पैठणी, नाशिकच्या कृषी समृद्धीचे प्रतीक असलेल्या काळा मनुका, काजूचा आणि नाशिकच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक असलेल्या चिवड्याचाही या संचात समावेश आहे. यासोबत निवडक मिठाई आणि सुकामेवादेखील भेट म्हणून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

Velhe News : किल्ले राजगडवर 'मर्दानी दसरा' संपन्न; राजगडावर शेकडो दुर्ग सेवकांची उपस्थिती

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; राजेंद्र शिंदेंची सहा तास चौकशी

Ausa Crime : औसा हादरले! मदत केल्याच्या कारणावरून भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT