नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजदंड प्रतिष्ठापनेचा समारोप

CD
फोटो : ---------------- कुंभमेळा ध्वजदंड प्रतिष्ठापनेचा समारोप शृंगेरी पिठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणानिमित्त गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे आयोजित ध्वजदंड प्रतिष्ठापनेचा समारोप रविवारी झाला. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांची प्रमुख उपस्थिती होती. या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमात देवता आवाहनापासून शांतिमंत्रापर्यंत अनेक विधी संपन्न झाले. कार्यक्रमात पहिल्या दिवशी प्रायश्चित्त संकल्पपूर्वक तीर्थ पूजन, पंचार्घ्य प्रदान, प्रधान संकल्प, गणेश पूजनादी पंचांग विधान, ब्राह्मण वरण, प्रधान देवता स्थापन आणि नवग्रह रुद्र स्थापन, स्नपन विधान, नवग्रह हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन आणि श्री गोदावरी प्रार्थना तसेच नगरप्रदक्षिणा झाली. दुसऱ्या दिवशी स्थापित देवता प्रातर्पूजन, महामहीम राष्ट्रपती व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेश पूजन, पंचार्घ्य समर्पण व तीर्थ पूजन, ध्वजारोहण, गोदाआरती व प्रार्थना तसेच प्रतिष्ठापना हवन, सायंपूजन व गोदाआरती झाली. रविवारी तिसऱ्या दिवशी प्रातर्पूजन, उत्तराखंड हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभृत स्नान, गोदाआरती, प्रार्थना आणि कर्म समर्पण हे कार्यक्रम झाले. तिन्ही दिवसांचे पौरोहित्य यज्ञविद्या वाचस्पती वेदमूर्ती भालचंद्र एकनाथशास्त्री शौचे गुरुजी (श्री क्षेत्र नाशिक) तथा यज्ञ आचार्य पंडित वैभव दीक्षित यांनी केले. कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. शास्त्रोक्त आणि वेदोक्त पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीय सोहळा महनीय ठरला. नाशिककर भाविकांनी यज्ञवेदीचे दर्शन घेतले. ---------- या कार्यक्रमासाठी श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, वैभव दीक्षित, सरचिटणीस प्रतिक शुक्ल, कार्याध्यक्ष शेखर शुक्ल यांनी मार्गदर्शन केले. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh protests : बांगलादेशात पुन्हा असंतोषाचा उद्रेक! वेतनवाढीसाठी हजारो कामगार रस्त्यावर; ढाका-गाझीपूरमध्ये जाळपोळ

Nagpur Sarafa Bishnoi Gang Threat : नागपुरातील सराफांना बिश्नोई टोळीची धमकी, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण

Drought Resistant Crop: दुष्काळात शेतकऱ्याला ओव्याचा आधार; कमी पाण्यात, कमी खर्चात हमखास उत्पन्नाची आशा

Pali Nagar Panchayat: करवाढीपूर्वी विकासकामांचा हिशेब द्या! अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली नगरपंचायतीवर २ नोव्हेंबरला धडकणार ‘संघर्ष मोर्चा’

Pune Rain Update : पुण्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला! औंधमध्ये जोरदार सरी, शहरातील अनेक भागांत पाऊस; पुणेकरांनी तारांबळ

SCROLL FOR NEXT