नाशिक

तुपकर पत्रकार परिषद

CD
कुंभमेळा पुढे ढकलून शेतकऱ्यांना मदत करा! -- शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी; सरकारवर टीकास्त्र सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : आम्ही माणसात देव पाहतो. अन्न पिकविणारा शेतकरी हाच देव आहे. त्यामुळे आगामी कुंभमेळा चार ते पाच वर्षे पुढे ढकला. तोच ३५ हजार कोटी रुपयांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खर्च करा. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर कुंभमेळा घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी श्री. तुपकर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. श्री. तुपकर म्हणाले, की राज्यभरात दुष्काळाने शेतकरी होरपळला आहे. मात्र, सरकारला कामांचा प्राधान्यक्रम कळत नाही. मागणी नसताना सव्वा लाख कोटी रुपये खर्चून शक्तिपीठ महामार्ग बांधला जात आहे. हा निधी, कुंभमेळ्याचा निधी आणि आमदारांचा पाच कोटी रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवावा. आमदार निधीतून मंदिरे किंवा सभागृहे न बांधता पिण्याचे पाणी, चारा व अन्नाची सोय करावी. दुष्काळामुळे आमदारांचे पगार तीन वर्षे बंद करावेत. सरकार सत्यमापनाच्या नावाखाली पंचनामे करून वेळ काढत आहे. रोज २५ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. सरकारने दहा दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा श्री. तुपकर यांनी दिला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, महिला प्रदेशाध्यक्षा चैताली शेलार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, अभिलाल पाटील, आनंदा पाटील, सुयोग पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पुण्याला मिळाले नवीन वैद्यकीय महाविद्यालय! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु

Vastu Tips: कपाटाच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' ५ गोष्टी; घरात येऊ शकते गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा! जाणून घ्या वास्तुनियम...

IPL 2027 Trade: यॉर्करने भल्याभल्यांना गार करणारा गोलंदाजाचं SRH संघात पुनरागमन, पण कोटींचं नुकसान; दिल्ली कॅपिटल्ससोबत मोठी ट्रेड

Mulshi News : दुष्काळग्रस्त असलेल्या तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळला; तालुक्यातील शेतकरी शासनाविरोधात आक्रमक

गोकुळच्या स्टेजवर जुना हिशेब? अमर खोत आणि बाबासाहेब असुर्लेकर यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT