फोटो : H35125
भारतीय तत्त्वज्ञानाच्या पूर्णत्वाचे चिन्ह म्हणजे कुंभ
प्रणव गोखले यांचे ज्ञानकुंभ व्याख्यानमालेत प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : कुंभमेळ्यातील स्नानाचे व पूजेचे श्रेय त्यांनाच प्राप्त होते, ज्यांची कुंभपर्वाच्या पावित्र्यावर श्रद्धा आणि भक्ती असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक प्रणव गोखले यांनी केले.
‘आयाम’ संस्थेतर्फे आयोजित ज्ञानकुंभ व्याख्यानमालेत ‘कुंभपर्वाचा परिचय’ या विषयावर ते बोलत होते. शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात हे व्याख्यान झाले. गोखले पुढे म्हणाले की, कुंभमेळ्याचे वर्णन करताना कुंभपर्व हे पावित्र्य, पूर्णत्व आणि अमृतत्व अशा संकल्पनांचे प्रतीक असून संपूर्ण राष्ट्राच्या एकत्रीकरणाचे कार्य म्हणजे कुंभमेळा होय. चार तीर्थक्षेत्रे, त्यांचे ग्रहयोग, खगोलशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान तसेच पर्यावरणीय व भौगोलिक दृष्टिकोन स्पष्ट करताना गोखले यांनी कुंभपर्वाचे आजच्या जीवनातील महत्त्व आणि त्याच्याशी असलेला संबंध समजावून सांगितला. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या उक्तीप्रमाणे कुंभपर्वातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार काही ना काही प्राप्त होते, असे ते पुढे म्हणाले तसेच ‘सिंहस्थ’ पर्वाचा अर्थ, स्वरूप तसेच कुंभमेळा आणि सिंहस्थ यांमधील फरक गोखले यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता आणि आदि शंकराचार्य यांच्या प्रतिमापूजनाने झाली. धनलक्ष्मी पटवर्धन यांनी गीत सादर केले. प्रास्ताविकात ‘आयाम’, नाशिकचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांनी सतत ज्ञानग्रहण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.