मुख्य पान ३
-------------
NSK26H33623
त्र्यंबकेश्वर ः येथे सोमवारी आनंदकुंभ संत संमेलनात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. व्यासपीठावर शिक्षणमंत्री दादा भुसे, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, आमदार सुहास कांदे, गोकूळ गिते, हिरामण खोसकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू महंत. (छायाचित्र ः कमलाकर अकोलकर)
--------
३६-४
साधू- महंतांच्या सर्व अडचणी सोडविणार
-----------
उपमुख्यमंत्री शिंदे ः नुकसान झालेल्यांना पक्की घरे, नगरपालिकेला नवी इमारत
-----------
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता.२६ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे बेघर झालेल्या कुटुंबीयांना पक्की घरे दिली जातील. व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकार त्यांना मोबदला आणि नगरपालिकेला त्याच जागेवर नवीन इमारत बांधण्यास प्रशासकीय मंजुरी देण्याची तसेच साधू महंतांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथील श्रीचंद लान्समध्ये सोमवारी (ता.२६) त्यांनी संत संमेलनात आखाड्यांचे साधू-महंत यांच्याशी संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
स्वामी शांततिगिरी महाराज, महंत महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, महंत सत्यगिरी महाराज, महंत धनंजयगिरी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रमेशगिरी महाराज, महंत दुर्गानंद महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत दुर्गादास महाराज, महंत रामनवमीदास महाराज, महंत गोपालदास महाराज, संत देवेंद्रसिंह शास्त्री, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, गोकूळ गिते, हिरामण खोसकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते.
संमेलनास उपस्थित साधू महंतांवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पवृष्टी केली. साधूमहंतांनी देखील शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. साधू महंतांचे रुद्राक्ष माला, शाल व पुष्पमाला देऊन स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संतांच्या माध्यमातून खरी दिवाळी साजरी होत आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्या संस्कारांनी महाराष्ट्र घडला. संतांनी भक्तीसोबत माणुसकी, समता आणि समाजसेवा शिकवली. “जे का रंजले गांजले...” या संत तुकारामांच्या विचाराचा दाखला देत गरजूंची सेवा हाच खरा धर्म असल्याचे शिंदे यांनी सांगितले. श्री. शिंदे यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेत पूजा व अभिषेक केला.
नगराध्यक्षा तुंगार यांनी कुंभमेळ्याच्या कामांमुळे रहिवाशांच्या मालमत्तेचे नुकसान होवू नये, येथे शंभर खाटांचे अद्ययावत जिल्हा उपरुग्णालय उभारण्यात यावे, खेळाडूंना क्रीडांगण, व्यावसायिकांचे झालेले नुकसान व त्यांच्या उपजीविकेबाबत व्यवस्था व्हावी अशा मागण्या केल्या. पालिकेच्या सफाई कर्मचारींनीही आपल्या अडचणी सोडविण्यासाठी मंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले.
…
१६-१ चौकट
मुलींच्या लग्नास शिवसेनेची मदत
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना मदत करणार आहे. कुंभमेळा हा केवळ श्रद्धेचा सोहळा नसून पर्यटन, व्यापार, रोजगार, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महोत्सव असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील १३ आखाड्यांतील संत-महंत आणि साधूंच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेतर्फे केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.