नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : एसआयआरच्या नावाखाली मतदानाचा अधिकार हिरावण्याचा डाव - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ :

CD
पान-२ IGT26B08936 कुरुंगवाडी (ता. इगतपुरी) : येथे संविधान बचाव अभियानांतर्गत चौपाल ग्रामसभेत मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ. शेजारी राजाराम पानगव्हाणे, भारत टाकेकर आदी. ----------------- ३६-३ एसआयआरच्या नावाने मतदान हिरावण्याचा डाव हर्षवर्धन सपकाळ : ‘वोट चोर, गद्दी छोड’चा कुरुंगवाडीतून शंखनाद सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.१२ : एसआयआरच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी आणि शहरी भागासह गावागावात मतदारांची नावे वगळून मतदारांच्या हक्कावर प्रशासनाने गदा आणली आहे. वगळलेले नागरिक त्याच गावचे मूळ रहिवासी आहेत, त्यांचा जन्म त्याच मातीत झाला आहे तरीही त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. गावातील २० टक्के मतदान परस्पर कमी करणे हा एसआयआरचा खरा आणि घातक चेहरा आहे. या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर आणि प्रशासनावर अतिशय आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. श्री. सपकाळ पुढे म्हणाले, ‘या अन्यायाविरोधात ‘वोट चोर, गद्दी छोड’ आणि ‘संविधान बचाव’ अभियानाच्या माध्यमातून कुरुंगवाडी येथे ग्रामसभा पार पडली आहे. या अभियानात पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचा एकमुखी ठराव येथील ग्रामस्थांनी केला असून, संपूर्ण गाव काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. श्री. सपकाळ, महाराष्ट्र प्रभारी सिरीवेला प्रसाद आणि सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्या उपस्थितीत सभा झाली. काँग्रेस नेते लकी जाधव, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा सरचिटणीस आकाश पारख यांनी संयोजन केले. सरपंच गोपाळ सावंत, पिंटू सावंत, शंकर सावंत यांनी ग्रामस्थांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या. हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका करताना देशातील नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यांना पुन्हा एकदा गुलाम बनवण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. देशाची संपत्ती आणि जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. आदिवासींची मूलनिवासी ओळख पुसून टाकण्याचा आणि त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रदेश नेते राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर आदी उपस्थित होते. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

SCROLL FOR NEXT