नाशिक

कुशावर्त परिसरातील कामे रविवारपर्यंत पूर्ण करावी : प्रसाद

CD
कुशावर्ताची कामे रविवारपर्यंत पूर्ण करा आयुष प्रसाद यांचे निर्देश : ध्वजारोहण तयारीचा आढावा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त परिसरातील कामे रविवार (ता. २५)पर्यंत पूर्ण करावीत. आवश्‍यकतेनुसार रात्रीच्या वेळीही कामे सुरू ठेवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यंत्रणांना दिले. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त मनुष्यबळाच्या सहाय्याने कामांना गती द्यावी, अशा सूचना केल्या. त्र्यंबकेश्‍वर येथे ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी यंत्रणांकडून जय्यत तयारी केली जाते. आयुक्त सिंह आणि जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मंगळवारी (ता. २०) तयारीचा आढावा घेतला. या वेळी आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्‍वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपनगराध्यक्षा पल्लवी शिरसाठ, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्‍वरचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की कुशावर्त तीर्थ परिसरातील कामांचा वेग वाढविण्यात यावा. कामांचे चार भागांत विभाजन करताना प्रत्येक भागासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा. आवश्यक काँक्रीट व पीसीसीची कामे, फॅब्रिकेशन, वेल्डिंग, रंगकाम आणि सँडब्लास्टिंगची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. पूर्ण झालेली कामे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावीत. आयुक्त सिंह यांनी, आवश्‍यक कामांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. परिसराचे सुशोभीकरण, परिसर स्वच्छता, मंडप उभारणी, आसनव्यवस्था, तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. कामांच्या अंमलबजावणीत दिरंगाई टाळण्यासाठी विभागांनी परस्पर समन्वय राखावा, असे निर्देश दिले. सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक तपासणी करावी. हेलिपॅड व एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संबंधित तांत्रिक बाबींची पाहणी करीत आवश्यक पूर्तता करण्यात यावी. शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करताना आवश्यक ती दुरुस्ती करावी. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करताना गरजेनुसार पर्यायी मार्गांचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. त्र्यंबकेश्‍वर मंदिर बंद राहणार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ३० व ३१ ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. या संदर्भातील अधिकृत निर्णय तसेच भाविकांना पूर्वसूचना देण्याबद्दल संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णयानुसार आवश्यक सूचना वेळेत प्रसिद्ध करावी, असे निर्देश आयुष प्रसाद यांनी दिले. फोटो क्रमांक : एच-33093

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : दसऱ्याचा मेळावा शेतकऱ्यांसाठी, सत्तापिपासू लोकांसाठी नाही; ज्योती वाघमारे यांचा घणाघात

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

Dussehra History : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा कसा साजरा व्हायचा? इतिहासातील रंजक गोष्टी!

SCROLL FOR NEXT