ॲंकर
दिपोत्सवाच्या झगमगाटात पणत्याचा संर्घष
-----------------------------------
एलईडी, विद्युत माळांच्या जमान्यात कुंभार उपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता.५ : दिवाळी म्हटले की घराघरांत पणत्यांची रोषणाई आणि दीपोत्सवाचे मंगलमय वातावरण. मात्र, बदलत्या काळात विद्युत दिवे, आकर्षक एलईडी माळा आणि विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याची वाढती लोकप्रियता यामुळे पारंपरिक मातीच्या पणत्यांची मागणी टिकवून ठेवण्यासाठी कुंभार बांधवांना संघर्ष करावा लागत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुंभार बांधवांकडून मातीच्या पणत्या तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. वर्षभर विविध मातीची भांडी आणि वस्तू तयार करणारे कुंभार बांधव दिवाळीच्या काळात पणत्या तयार करण्यावर विशेष भर देतात. माती गोळा करणे, ती भिजवून मळणे, चाकावर पणत्या घडविणे, वाळविणे आणि भाजणे, अशा अनेक टप्प्यांतून पणत्यांची निर्मिती केली जाते. त्यानंतर रंगरंगोटी करून या पणत्या विक्रीसाठी बाजारपेठेत आणल्या जातात.
या पारंपरिक व्यवसायात मेहनत अधिक आणि उत्पन्न मर्यादित असल्याची परिस्थिती आहे. पणत्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, इंधन, वाहतूक आणि मजुरीचा खर्च वाढत असताना विक्रीतून अपेक्षित उत्पन्न मिळेलच, याची खात्री नसते. त्यातच बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईमुळे मातीच्या पणत्यांना स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे.
मातीच्या पणत्या या केवळ दिवाळीच्या सजावटीचा भाग नसून भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहेत. मातीच्या पणत्यांमधून मिळणारा प्रकाश हा दिवाळीच्या उत्सवाला पारंपरिक आणि नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतो. त्यासाठी दिवाळीच्या खरेदीत स्थानिक कुंभार बांधवांच्या मातीच्या पणत्यांना ग्राहक मिळण्याची गरज आहे.
चौकट
दृष्टीक्षेपात पणत्या
मातीची पणती -३० रूपये डझन
चायना पणती - ३० रूपये डझन.
मातीचे करवा बोळके - १०० रूपये डझन
लक्ष्मी मुर्ती - ५० ते २०० रूपये.
-----------
परंपरागत वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यामुळे बांधिलकीने हे सर्व करतो. आधुनिकतेच्या युगात संस्कृती लोप पावत चालली असताना दिवाळीची समृद्ध परंपरा टिकवण्यासाठी मातीच्या पणत्या व बोळके दरवर्षी तयार करतो. चायना पणतीने मार्केट जाम केले आहे.कच्चे साहित्य, लिद माती महाग झाली.मजूरीही निघत नाही.
- हेमंत कुंभार,मोची कॉर्नर, मालेगाव
दिवाळी सणाच्या निमित्ताने मातीच्या पणत्यांची रोषणाईच ख-या अर्थाने संस्कृती संवर्धक आहे.कुंभार बांधवांकडून मातीच्या पणत्या व बोळके खरेदी करून या व्यवसायाला हातभार लावावा. रस्त्यावर विक्री करणाऱ्यांची दिवाळी साजरी होईल हे भान जपणं महत्त्वाचे आहे.
- कल्पना लोहारकर, कवयित्री, मालेगाव.
मालेगाव शहर : सोमवार बाजार भागातील पणत्यांची दुकाने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.