नाशिक

केवायसीच्या अटीमुळे शेतकरी त्रस्त,सर्व्हे डाऊन चा फटका

CD
PML26B10249 पिंपळगाव बसवंत ः केवायसीसाठी ताटकळत उभे असलेले आहिरे दाम्पत्य. ------------- ३६-३ केवायसी पूर्ततेसाठी तासनतास रांगेत ------------- विविध अटीमुळे शेतकरी त्रस्त, सर्व्हर डाऊनचा बसतोय फटका ------------- सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१६ ः गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीबाधितांना जाहीर झालेली मदत त्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आगहे. कधी सर्व्हर डाऊन तर कधी अंगठ्यावरील ठसे न जुळणे अशा एक ना अनेक अडचणींमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ----------------- निफाड तालुक्यातील द्राक्षबागांसह विविध पिकांचे गतवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांतून १७ हजार शेतकऱ्यांना २५ कोटी ५३ लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मंजूर होऊन उपलब्ध झाली आहे. मात्र, मदत मिळविण्यासाठी बँक खाते आणि आधार लिंक करण्यासह केवायसीची प्रक्रिया बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्यांची सेतू कार्यालयांमध्ये धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. गतवर्षी अतिवृष्टी व यंदा अल्प पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज, औषधे, खते आणि मजुरीचा खर्च यामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी त्यांना कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. सेतू कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन होत असल्याने केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे. १६-१ शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी गतवर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून मिळणारी मदत शेतीच्या पुढील कामांसाठी उपयोगी पडणार आहे. मात्र, केवायसीसाठी वारंवार सेतू कार्यालयात जावे लागत असून सर्व्हर बंद असल्याने काम होत नाही. त्यामुळे मदत मिळण्यास विलंब होत आहे. दुसऱ्या शेतकऱ्यानेही केवायसी प्रक्रियेसाठी होणाऱ्या गर्दीबाबत नाराजी व्यक्त केली. ----- कोट गेल्या दोन दिवसांपासून केवायसीसाठी सेतू कार्यालयात हेलपाटे मारत आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जात आहे. वेळ व पैशाची अपव्यय होत आहे. - मधुकर चंदर अहिरे, शेतकरी, दावचवाडी. ---- शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळणे गरजेचे आहे. तांत्रिक अडचणींमुळे मदत रखडू नये. शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा म्हणून केवायसीची अट रद्द करण्याची मागणी कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केली आहे. - दिलीप बनकर, आमदार ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT