Gram Panchayat Election  esakal
नाशिक

Labor Federation Election : भोसलेंना धक्का; सकाळे-आहेर-खेमनार यांची सरशी!

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार : विकास गामणे

जिल्हा मजूर फेरडेशन संस्थांचा संघ तसा ठेकेदार, मक्तेदारांचाच जास्त. मात्र अलिकडे यातही राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढला अन या संस्थेच्या निवडणुकांना राजकीय रंग भरण्यास सुरूवात झाली. मजूर फेडरेशवर आतापर्यंत राजेंद्र भोसले, केदा आहेर, संतपराव सकाळे यांचे वर्चस्व राहिलेले. (Labor Federation Election Shock to Bhosle elected of sakale aher Khemnar nashik news)

यंदा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी झाल्याने भोसले, आहेर व सकाळे यांनी बैठक घेत, इच्छुकांची संख्या अन राजकिय दबाव असल्याने आपण पॅनल निवडणुकीत उतरविणार नसल्याचे घोषित केले. ही घोषणा झाल्यानंतर, अनेकांनी माघार घेणे पसंत केले. मात्र, भोसले यांनी पडद्याआड राहून पॅनल निर्मिती करण्यााचा घाट घातला अन हा घाट त्यांच्या अंगलट आला. भोसले यांचे मालेगाव तालुक्यात मोठे वर्चस्व आहे. फेडरेशनच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला फार महत्व.

त्यामुळे त्यांनी निवडणुकीत योग्य ती भूमिका घेऊन निभवण अपेक्षित होते. मात्र, पॅनल देणार नसल्याचे एकिकडे सांगणे अन दुसरीकडे पॅनल तयार करत मतांचा जोगवा मागितला. यातही उमेदवारांची चाचपणी न करता आप्तेष्टांच्या मर्जीने उमेदवारी निश्चिती करत मालेगावसह जिल्हाभरातून त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली. त्यामुळे भोसले यांची बदलती भूमिका मतदारांना पचनी पडली नाही. याउलट केदा आहेर यांनी घोषणा केल्याप्रमाणे अलिप्तवादी राहणे पसंत केले. त्यांनी देवळा तालुक्यात देखील लक्ष घातले नाही.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

भोसले यांनी भूमिका बदलल्याने सकाळे यांनी, सहकार पॅनलमागे आपली ताकद उभी केली. या माध्यमातून त्यांनी जिल्हाभर प्रचाराची राळ उठविली. यात सकाळे यांच्या पदरी यश मिळाले. भोसले यांच्या पॅनलचे अनुसूचीत जाती-जमाती गटातून शशीकांत उबाळे हे एकमेव निवडून निवडुन आलेले आहे. त्यातुलनेत, सकाळे यांनी ओबीसी गटातून अर्जुन चुंभळे व एनटी गटातून राजभाऊ खेमनार यांना निवडून आणत आपला दबदबा दाखवून दिला. सकाळे यांच्या समवेत कृष्णराव पारखे, अनिल आव्हाड यांनी मेहनत घेतली.

दोन महिला भोसले यांच्या पॅनलला दिसत असल्या तरी, त्यांना सर्वपक्षीय नेत्यांना पाठींबा होता. त्यामुळे महिला गटात तशीही फारशी लढाई नव्हती. यामुळे भोसले यांनी हात दाखवून अवलक्षणं करून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतमोजणी झाल्यानंतर, सकाळे-आहेर-खेमनार एकत्र आले असून त्यांचा गट स्थापन झाला असून त्याचा उदय झाला आहे. त्यांच्या गटात 11 संचालकांनी हजेरी लावत पाठींबा दर्शविला. त्यामुळे फेडरेशनच्या आगामी काळात हा गट, भोसले यांच्या गटाला टक्कर देणार हे मात्र, नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT