Lack of fire extinguisher system bus 
नाशिक

बसमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव

नाशिकमध्ये ‘आरटीओ’कडून बसची तपासणी सुरू

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : नाशिक येथे अपघातात खासगी प्रवासी बस जळून खाक झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना जाग आली आहे. त्यांनी यवतमाळ येथील ट्रॅव्हल्स पॉइंटला भेट देऊन बसेसची पाहणी केली. या पाहणीत बसमध्ये अग्निशमन यंत्रणेचा अभाव दिसून आला. आता ही तपासणी नियमित सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक येथे झालेल्या अपघाताने लांब पल्ल्यावर धावणाऱ्या खासगी बस खरोखरच सुरक्षित आहेत का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अपघात होताच उपप्रादेशिक परिवहन विभागाला खडबडून जाग आली. त्यांनी बसी पाहणी केली. एकाही बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आढळली नाही. यासंदर्भात संबंधितांना विचारणा केली असता, हीर यंत्रणा दुसऱ्या वाहनात असल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले.

अशाच प्रकारची अवस्था अनेक बसची आहे. वर्धा-नागपूर, अमरावती, पुसद मार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये अपवादानेच अग्निशमन यंत्रणा आहे. आता बसेस प्रवासयोग्य आहेत का, बसची उंची, लांबी रुंदीची पाहणी करण्यात येत आहे. त्यात दोन बर्थमधील अंतर किती असले पाहिजे, याकडे लक्ष दिले जात आहे.

गाड्या मंजुरीसाठी येतात. त्यावेळी सर्व नियम पडताळून बघितले जातात. स्लिपर कोच वाहने लांब अंतरासाठी धावतात. त्यामुळे त्यांची तपासणी गांभीर्यपूर्वकच केली जाते.

- ज्ञानेश्‍वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT