Cyclone found dead in bird sanctuary. esakal
नाशिक

Nashik News : लडाख- तिबेटमधील स्थलांतरित चक्रवाकचा मृत्यू; नांदूरमधमेश्‍वरमधील घटना

आनंद बोरा

नाशिक : हिमालयाच्या उंच रांग ओलांडून हिवाळ्यात भारतात येणाऱ्या चक्रवाक पक्ष्यांचे तीर्थ नांदूरमधमेश्‍वर (जि. नाशिक) पक्षी अभयारण्य. या अभयारण्यात चक्रवाकचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. कोठुरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय तपासणीत चक्रवाकचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले.

वन्यजीव छायाचित्रकाराने टिपलेल्या छायाचित्रामध्ये एक पक्षी पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. वन विभागाचे कर्मचारी गंगाधर अघाव, एकनाथ साळवे यांनी पाण्यात उतरून पक्षी बाहेर काढला. त्यावेळी चक्रवाक हा स्थलांतरित पक्षी असल्याचे आढळून आले.

तसेच त्याचा एक पाय तुटलेला होता. पोटाला मोठी जखम झालेली होती. हे पक्षी तीन महिनेअगोदर स्थलांतरण करून इथे आले असून त्यांची संख्या पन्नासच्या आसपास आहे. इतके पक्षी आणि मुबलक खाद्य उपलब्ध असताना पक्षाचा उपासमारी मुळे मृत्यू झाला असल्याने इतर पक्ष्यांचे काय? असा प्रश्‍न तयार झाला आहे.

या शिवाय पाण्याचे नमुने तपासून त्यामध्ये रासायनिक घटक आहे काय? याची तपासणी होणार आहे काय? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. पाण्यातील जाळे, आकडे यामध्ये चक्रवाक अडकून मृत्यू झाला आहे काय? याविषयीची पक्षीप्रेमींमध्ये साशंकता आहे.

अभयारण्यात ‘रेस्क्यू सेंटर' नसल्याने पक्ष्यांना वेळेवर औषधोपचार मिळण्यात अडचण येते. त्यामुळे पक्षी अभयारण्य कायमस्वरूपी पशुदेखभाल केंद्र सुरु करण्याची मागणी पक्षीमित्र करत आहेत. परिसरात मासेमारी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करू पाहत आहेत काय? याची पडताळणी पक्षीप्रेमींना आवश्‍यक वाटते.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

"चक्रवाक पक्ष्याच्या मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तीन पथके तयार केली आहे. अभयारण्याच्या सर्व बाजूने सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच पथक पाण्यात उतरून पक्ष्यांचे निरीक्षण करणार आहे. मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे."

- प्रीतेश सरोदे, राउंड ऑफिसर, पक्षी अभयारण्य

"चक्रवाक पक्ष्याचे ‘पोस्ट मार्टेम' केले असता, त्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचे आढळून आले. पक्षी मोठा प्रवास करून आल्यावर खाद्य मिळाले नाही, तर दगावू शकतात."

- डॉ. रवींद्र चांदोरे, पशुवैद्यकीय अधिकारी

"स्थलांतरित पक्ष्याचा पक्षी अभयारण्यात मृत्यू होणे, हा प्रकार प्रश्‍नचिन्ह तयार करणारा आहे. अभयारण्यात वीस हजारांपेक्षा अधिक पक्षी आहेत, मग त्यांचे कसे होईल? याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे." - डॉ.उत्तम डेर्ले, पक्षीमित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT