womens eating first in wedding esakal
नाशिक

विवाह समारंभात पंगतीतही लेडीज फस्ट!; सर्वच सोहळ्यात व्हावी अंमलबजावणी

एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुरूषप्रधान संस्कृतीचा (patriarchal culture) प्रत्यय विवाह समारंभातही येतो. बहुतांश विवाह समारंभात (Wedding Ceremony) भोजनासाठी दोन ते तीन पंगतीनंतर महिलांची पगंत होते. लग्नाला उशीर झाल्यास भुकेने व्याकुळ महिलांची कोणी दखल घेत नाही. महिलांसोबत असलेल्या मुलांचीही भूक लागल्याने रडारड सुरू होते. पहिल्या पंगतीनंतर वाढप्यांची संख्या कमी होते. महिलांची विवाह सोहळ्यातील ही परवड थांबविण्यासाठी यंदा बहुतांश लग्न सोहळ्यात महिलांना प्राधान्यांने पहिल्या पगंतीचा मान दिला जात आहे. जुन्या परंपरेला मूठमाती देत स्त्री शक्तीचा हा अनोखा उपक्रम लग्न सोहळ्यात दिसू लागला आहे. जेवणाला लेडीज फस्टच्या (Ladies First) प्रयोगामुळे वऱ्हाडी महिलामध्ये आनंद व्यक्त होत आहे. (Ladies first at the wedding dinner Nashik News)

लग्न सोहळ्यातील जेवणाच्या पगंती आता टेबलवर होतात. कुठे पहिली पंगत पुरूष मंडळीची तर दुसरी पंगत पुरूष व महिलांची संयुक्त होते. काही ठिकाणी तिसरी पंगत महिलांची होते. दोन पंगतीनंतर वाढणारेही थकतात. वऱ्हाडी मंडळीचा अंदाज न आल्यामुळे स्वयंपाक कमी पडतो. यामुळे महिलांच्या पगंतीला कुठे भाजी तर कुठे भातच उरत नाही. गोड पदार्थाची वाणवाच असते. पुरूष पहिल्या पंगतीत भोजन करून परत निघायची गडबड करतात. यामुळे महिलांची विवाह समारंभात भोजनाची व्यवस्था ठिकशी होत नाही. याचे खापर आयोजकांवर फुटते. गावभर बोभाटा होतो.

यावर उपाय म्हणून यंदा बहुतांश विवाह सोहळ्यात पहिल्या पंगतीत महिलांना बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगलअष्टके संपताच तशी घोषणा केली जात असून गावातील व पाहुण्या मंडळीतील महिलांना पहिल्या पंगतीत भोजन करण्याची आग्रह केला जात आहे. नव्या पायड्यामुळे महिलांना घाई न करता पोटभर व चांगले भोजन मिळते. पुरूष मंडळीना भोजनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे उलट चित्र पहायला मिळत आहे.

"महिलांना सन्मान देण्यासाठी जुन्या प्रथांना मूठमाती देण्याच्या ग्रामीण भागात घटना जाणीवपूर्वक घडत आहे. विवाह समारंभात महिलांची पहिली पंगत हा मोठा सामाजिक बदल असून यातून महिलांची काळजी वाहणाऱ्या व सन्मान वाढवणाऱ्या ग्रामस्थाचे अभिनंदन करायला हवे. सर्व विवाह सोहळ्यात नव्या प्रथेचे अनुकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी वधू व वरांकडील मंडळीनी पुढाकार घ्यायला हवा. विवाहानंतर अनेक महिला उपाशीपोटी घरी जात होत्या. नव्या प्रथेमुळे त्यांची गैरसाय टळणार आहे."

- मीना राका, तनिष्का भगिनी, पिंपळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT