Palkhi of Khanderao, Mhalsa, Banubai.
Palkhi of Khanderao, Mhalsa, Banubai. esakal
नाशिक

Nashik News : येळकोट येळकोटच्या गजराने दुमदुमली चंदनपुरी! लाखावर भाविक खंडेरायाच्या चरणी

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव / येसगाव (जि. नाशिक) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे शुक्रवारी (ता.६) उत्साहात सुरवात झाली. येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत लाखावर भाविक खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाले. खोबरे-भंडाऱ्याची उधळण करत मल्हार भक्तांनी अवघी चंदनपुरी डोक्यावर घेतली होती.

देवाच्या मुकुटासह पालखी, काठ्यांची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. पालकमंत्री दादा भुसे व अनिता भुसे यांनी महापूजा केली. (Lakh devotees meet at Chandanpuri Khanderaya yatrotsav Nashik News)

पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर चंदनपुरीत यात्रोत्सवाला सुरवात झाली. भंडाऱ्याने न्हाऊन निघालेल्या चंदनपुरी नगरीला सोन्याचे रूप आले होते. दिवसभरात लाखावर मल्हारभक्त देवाच्या चरणी नतमस्तक झाले. तळी भरणे, देव भेटविणे, कोटम भरणे आदी कार्यक्रमांची कुटुंबीयांकडून रेलचेल होती.

यात्रेत शेकडो दुकाने लावण्यात आली आहेत. बोचरी थंडी जुगारून मल्हारभक्त कालपासूनच चंदनपुरीत दाखल झाले होते. भल्या पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी आठला डीजेंच्या निनादात तसेच खंडेराव महाराज, म्हाळसा देवी व बानाई मातेच्या जयकाराने कौतिक आहिरे यांच्या घरापासून पालखी मिरवणुकीला सुरवात झाली.

पालखीत श्री खंडेराव महाराज, म्हाळसा देवी व बाणाई मातेची मुकुट, काठी ठेवण्यात आले होते. भंडारा उधळत, देवाचा गजर करीत पालखी मिरवणुकीचे संपूर्ण गावातून जोरदार स्वागत करण्यात आले.

दरम्यान पालकमंत्री दादा भुसे व अनिता भुसे, भाजप नेते सुरेश निकम, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी देवाची महापूजा केली. तसेच वाघ्या मुरळीकडून तळी भरून घेतली. सकाळी नऊनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ होऊन दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी बारानंतर जय मल्हारचा गजर आणखी वाढला.

या वेळी भविकांनी मोठ्या प्रमाणावर उधळलेल्या भंडाऱ्यामुळे मंदिर परिसराने जणू पिवळा शालू पांघरला होता. यात्रोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वाघ्या मुरळी चंदनपुरीत दाखल झाले होते. बानूबाईच्या मंदिरासमोर नवसपूर्तीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. लंगर तोडण्याचे नवस फेडले जात होते.

यात्रेत श्रीफळ, फुलहार,पेढे, भंडारा, शेवरेवडी आदींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नवसपूर्ती आलेल्या हजारो भाविकांनी जागोजागी चुली मांडून स्वयंपाक केला. पुरणपोळी बरोबरच मटणाचा स्वाद दरवळत होता.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

यात्रा यशस्वितेसाठी जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, सरपंच विनोद शेलार, उपसरपंच विनिता सोनवणे, डी. एफ. पाटील, अशोक अहिरे, मनोहर जोपळे, सुभाष पवार, सरला अहिरे, दीपाली सोनवणे, वैशाली पाटील, मनिषा पवार, मंगला पवार, नितीन सुर्यवंशी, कैलास शेलार, समाधान ऊशिरे, लक्ष्मी सकट, दादाजी सोनवणे, सोनाली शेलार, शालिंदर पाटील, माणिक महाराज, संतोष शेलार, धनराज राखपसरे, बाबाजी शेलार, संजय अहिरे, दादाजी सोनवणे, शरद वाघ, संजू अहिरे, धनराज मोरे, जितेंद्र सोनवणे आदी प्रयत्नशील आहेत. किल्ला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

अर्थव्यवस्थेला चालना

श्री खंडेरावाच्या यात्रोत्सवामुळे गाव व परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यात्रेत पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनादेखील मोठा दिलासा मिळेल. पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात लाखो मल्हार भक्त हजेरी लावणार आहेत.

शहरासह कसमादेतील श्रध्दाळू यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात गर्दी करतात. थंडीचा तडाखा कमी झाल्यानंतर चंदनपुरीतील गर्दी वाढेल. येथील यात्रेतील भजी-जिलेबी व शेवरेवडी राज्यभर प्रसिद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT