Standards in taluk- Village liquor stock destroyed in Dahikute Shivara. esakal
नाशिक

Nashik Crime: मालेगाव परिसरात लाखाची गावठी दारू नष्ट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : राज्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गावठी हातभट्टी दारू उच्चाटन सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेशान्वये विभागीय उपायुक्त तडवी,

अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुक्यातील मानके - दहिकुटे शिवारात विशेष मोहीम राबवीत कानोळी नदी किनारी गावठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापे टाकून हातभट्टी निर्मिती साठी लागणारे रसायन, प्लास्टिक तसेच लोखंडी ड्रम,असा दारूबंदी गुन्ह्याखालील मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. (Lakh village liquor destroyed in Malegaon area Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे छोटे मोठे पातेले, हांडे जप्त करण्यात आले. कारवाईत एकूण रुपये एक लाख ५ हजार ८०० रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क, मालेगाव विभागाचे निरीक्षक डी. एल. जगताप, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, सहायक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, जवान दीपक गाडे, श्याम पानसरे, प्रवीण अस्वले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT