Vilas Pangarkar speaking at the press conference. Neighbors Ramesh Pangarkar, Datta Vaichle, Pvt. Rajaram Mungse, Vitthal Jape, Namdev Kotwal etc. esakal
नाशिक

Jarange Patil Sabha: जरांगे पाटलांच्या सभेसाठी लाखो जनसमुदाय येणार! जिल्ह्यातील पहिलीच सभा रविवारी पांगरीत

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची नाशिक जिल्ह्यातील पहिली सभा सकल मराठा समाज व छावा मराठा संघटनेतर्फे पांगरी येथे रविवारी (ता. ८ ) दुपारी चारला होणार आहे.

लाखोच्या वर समाजबांधव सभेला उपस्थित राहतील, असा दावा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी केला. जरांगे-पाटील मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका मांडून मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. (Lakhs of people will come for Jarange Patil Sabha first meeting of district will be held on Sunday at pangri nashik)

येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पांगरी येथे संत हरिबाबा मंदिरासमोर सिन्नर-शिर्डी मार्गावर बंद असलेल्या उड्डाणपुलाच्या मोकळ्या जागेत ही सभा होणार आहे.

माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर, महामित्र परिवाराचे दत्ता वायचळे, निवृत्त प्रा. राजाराम मुंगसे, नामदेव कोतवाल, जगदीश पांगारकर, संपत पगार, मयूर पांगारकर, कैलास दातीर, विठ्ठल जपे, हरिभाऊ तांबे, सुभाष पगार, दत्तू पवार, भाऊसाहेब शिंदे, वामनराव पवार आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात कुणबीचे दाखले मिळतात. मात्र, ते सरसकट मिळावेत, ही आमची मागणी आहे. यासंदर्भात जरांगे-पाटील मार्गदर्शन करणार आहेत. जरांगे-पाटलांना अनेक गावातून पाठिंबा मिळाला आहे.

पाठिंबा म्हणून राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहेत. पांगरी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला ८० हजारापर्यंत नागरिकांनी भेट दिल्या आहेत. त्यामुळे लाखोच्या वर लोक पांगरी येथे सभेसाठी नक्कीच येणार, असे पांगारकर यांनी सांगितले.

तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये नियोजन बैठका झाल्या असून, समाजबांधवांनी पदरमोड करून सभेला उपस्थित राहणार आहेत, असे दत्ता वायचळे यांनी सांगितले.

समाजातील दानशूर व्यक्तींनी सभेत पाणी व आवश्यक सेवांसाठी पुढाकार घेतला असल्याचे प्रा. मुंगसे यांनी सांगितले. उत्स्फूर्तपणे नागरिक सभेला उपस्थित राहणार असून, तालुक्यातील जवळपास ५० गावांमध्ये नियोजन बैठका घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पार्किंग व्यवस्था

संत हरिबाबा मंदिर पटांगण, मिठसागरे रोड कॉर्नर, माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शाळा, महादेव मंदिर, वावीकडून येणाऱ्या मार्गावर मोकळ्या जागेत, अशा सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

निफाड बाजूकडून येणाऱ्या नागरिकांसाठी मिठसागरे रोड कॉर्नर, वावीकडून येणाऱ्या वाहनांसाठी गावाबाहेर, सिन्नरकडून येणाऱ्या वाहनांसाठी हरिबाबा मंदिर, माध्यमिक विद्यालयात पार्किंगची व्यवस्था आहे. प्राथमिक शाळेत दुचाकींना स्वतंत्र पार्किंग असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT