नाशिक

सप्तशृंगी मातेच्या महालक्ष्मी रूपाचे मनोहारी दर्शन.....

CD
पान-३ मेन ------------------ VNI26B13470 सप्तशृंगगड : लक्ष्मीपूजनानिमित्त विविधरंगी पुष्पांनी सजविण्यात आलेला मंदिराचा गाभारा आणि पोपटी- हिरव्या रेशमी महावस्त्रांसह सुवर्णालंकारांनी नटलेली महालक्ष्मी स्वरूपातील आदिमाया सप्तशृंगी. VNI26B13473 ( २ कॉ) फक्त सप्तशृंगगड ः ट्रस्ट कार्यालयात लक्ष्मीपूजनप्रसंगी आदिमायेच्या महाअलंकाराचे पूजन करताना ट्रस्टचे इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार व मंत्रोच्चारात करताना पुरोहित प्रसाद दीक्षित --------------- आदिमाया सप्तशृंगीला सुखसमृद्धीचे साकडे ------------ लक्ष्मीपूजनाच्या पर्वावर भाविकांना महालक्ष्मी रूपातील तेजोमय दर्शनाचा लाभ ------------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता. ८ : ‘सौभाग्यदात्री महालक्ष्मी, भक्तसदा वरदा... सप्तशृंग वास करूनी दर्शन देई जना... जनपूजितो लक्ष्मीपूजन व्रतपूजा... धनधान्य देई, वणीवासिनी सदा असो करुणा...’ अशा भक्तिभावपूर्ण प्रार्थनेतून धन, धान्य, ऐश्वर्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री असलेल्या आदिमाया सप्तशृंगीमाता चरणी हजारो भाविकांनी लक्ष्मीपूजनाच्या पावनपर्वावर नतमस्तक होत सुख-समृद्धीचे साकडे घातले. श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा त्रिगुणात्मक स्वरूपातील सप्तशृंगी मातेचे महालक्ष्मी रूपातील तेजोमय दर्शन भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा अविस्मरणीय सोहळा ठरले. ----------- दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाच्या मंगलदिनी सकाळी सात वाजता आदिमायेच्या सुवर्णालंकारांचे न्यासाच्या कार्यालयात विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात अलंकारांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत न्यासाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. लक्ष्मीपूजन आणि दीपावलीनिमित्त सप्तशृंगगडावरील मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा, शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या तिन्ही महाद्वारांना विविधरंगी फुलांचे तोरण व झुंबरांनी सजविण्यात आले होते. मंदिर सभामंडपातील आकर्षक आकाशकंदील आणि फुलांच्या सजावटीने संपूर्ण परिसर दीपोत्सवाच्या मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. आदिमायेच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना विविध रंगी पुष्पांची मनोहारी आरास करण्यात आली होती. या फुलांच्या सजावटीमुळे मंदिराच्या गाभाऱ्यात एक वेगळीच प्रसन्नता आणि भक्तिरसाची अनुभूती येत होती. धुळे येथील भाविक सविता कदम यांच्या माध्यमातून सजावटकार शंकरराव जुन्नरे यांनी मंदिर पर्यंवेक्षक सुनील कासार, पुरोहित मंडळ यांच्या यांच्या सहकार्याने ही आकर्षक पुष्परचना साकारली. दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या दिनी होणारी पंचामृत महापूजा देणगीदार भाविक सुधीर सोनवणे यांच्या हस्ते विधिवत झाली. लक्ष्मीपूजनाच्या औचित्याने आदिमायेला पोपटी-हिरव्या रंगाची, गुलाबी किनार आणि नक्षीकाम असलेली रेशमी महावस्त्रे परिधान करण्यात आली होती. सुवर्णालंकारांचा मनोहारी साज, मंगळसूत्र, कुयरी हार, पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, नथ, कर्णफुले, पावले, तोटे आदी पारंपरिक अलंकारांनी मातेचा साजशृंगार करण्यात आला होता. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास न्यासाच्या कार्यालयात आदिमायेच्या सोन्या-चांदीच्या सर्व अलंकारांचे पुरोहितांच्या मंत्रघोषात विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी न्यासाचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. धनधान्य, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीची अधिष्ठात्री असलेल्या महालक्ष्मीच्या चरणी दीपोत्सवाच्या पर्वावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे वीस हजार भाविकांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. मंदिरातील मंगलमय वातावरण, मंत्रघोष, फुलांची आरास आणि महालक्ष्मी स्वरूपातील आदिमायेचे अलौकिक रूप यामुळे सप्तशृंगगडावर भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

Pune News: शनिवार-रविवार पुण्यातील सिंहगडावर पर्यटकांची मांदियाळी; दोन दिवसांत ४ हजारांहून अधिक जणांची हजेरी

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Shambhuraj Desai : "पाच हजार ही केवळ सुरुवात, पूर्ण मदत मिळणार"; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभूराज देसाईंचा मोठा दिलासा, सरकार सोबत असल्याचीही दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT