नाशिक

विखरणीत एकोप्यातून सार्वजनिक लक्ष्मीपूजनाचा दीप उजळतोय! अखंड परंपरा; हिंदू-मुस्लिम बांधवांचा एकत्रित सहभाग,प्रशासक राजवटीतही ग्रामस्थांचा स्नेहबंध

CD
कृपया आवश्यक फोटो-27436, 27435 विखरणी : ग्रामपंचायत कार्यालयात सर्वधर्मीय ग्रामस्थांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन करताना डॉ. मोहन शेलार व पदाधिकारी. विखरणीत एकोप्यातून उजळतोय लक्ष्मीपूजनाचा दीप अखंड परंपरा; हिंदू-मुस्लिम बांधवांचा एकत्रित सहभाग सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ८ : पदे बदलली, सत्तेची समीकरणे बदलली, ग्रामपंचायतीचा कारभारही प्रशासकांकडे गेला; मात्र गावाशी असलेली नाळ आणि ग्रामस्थांमधील एकजुटीची भावना तसूभरही कमी झाली नाही. याची प्रचीती तालुक्यातील विखरणी येथे आली. १६ वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेली सार्वजनिक लक्ष्मीपूजनाची परंपरा यंदाही ग्रामस्थांनी जपली. धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा हा अनोखा सोहळा २०१० पासून विखरणीच्या गावपणाचे दर्शन घडवणारा ठरतोय तो पंचायत समितीचे माजी गटनेते डॉ. मोहन शेलार यांच्या संकल्पनेतून..! ग्रामपंचायत ही केवळ सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांची संस्था नसून ती संपूर्ण गावाची सामूहिक मालकीची व्यवस्था आहे, ही भावना ग्रामस्थाच्या मनात रुजावी, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला. तेव्हापासून दर वर्षी लक्ष्मीपूजनाला सकाळी नऊला ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येतात. ग्रामपंचायतीचे चेकबुक, खतावणी, घरपट्टी व पाणीपट्टीची पावती पुस्तके यांचे पूजन केले जाते. त्यानंतर सर्वजण फराळाचा आस्वाद घेतात. यंदा सरपंच आणि सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने कारभार प्रशासकांकडे आहे. त्यामुळे पदाधिकारी नसताना सार्वजनिक लक्ष्मीपूजनाची परंपरा यंदा कशी पार पडणार, असा प्रश्न होता. मात्र, ग्रामस्थांनी औपचारिक निमंत्रणाची वाट न पाहता स्वतःहून उपस्थिती लावली. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे प्रशासक राजवटीतही ग्रामस्थांनी परंपरेचा धागा तुटू न देता सामाजिक सलोख्याची वीण घट्ट केली. सोपान पगार, सुकदेव शेलार, काशीनाथ शेळके, साहेबराव शेलार, अंबादास पगार, अशोक बंदरे, करीम दरवेशी, मुक्तार दरवेशी, आलीम शहा, नामदेव पगार, केशव पगार, दत्तू शेलार, किशोर ननवरे, तवकल दरवेशी, नारायण वाघमोडे, शिवाजी बिडगर, अकील दरवेशी, शकील शहा, शिवाजी वाघमोडे आदी उपस्थित होते. ........ ग्रामपंचायत ही ग्रामस्थांच्या मालकीची संस्था आहे. माझ्या गावाचा कारभार येथून चालतो आणि सरपंच कोणत्याही पक्षाचा किंवा गटाचा असला, तरी तो आपल्या गावकीच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. याच विचारातून २०१० मध्ये सार्वजनिक लक्ष्मीपूजनाची संकल्पना सुरू केली. आज १६ वर्षांनंतरही ही परंपरा पुढे नेत आहेत ही समाधानाची बाब आहे. - डॉ. मोहन शेलार, माजी गटनेते, पंचायत समिती, येवला ........

भारतातील एका वर्षाच्या आठवणींनी परदेशी पर्यटक भावुक; 'या देशाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला'

India Women Squad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वनडे, टी२० अन् कसोटी संघांची घोषणा! स्मृती मानधना असणार कर्णधार

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

SCROLL FOR NEXT