Consumers buying electronics items on the occasion of Lakshmi Puja. esakal
नाशिक

Lakshmi Pujan 2023: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत 20 टक्क्यांची वाढ! व्यावसायिकांमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा

lakshmi Pujan 2023 : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नवी वस्तू खरेदीचा मुहूर्त साधला जातो. रविवारी (ता. १२) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नाशिककरांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेटची बंप्पर खरेदी केली.

खरेदीतून इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाली. गत वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत वस्तू खरेदी वीस टक्क्यांनी वाढल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साह होता. (lakshmi pujan 2023 20 percent increase in electronic goods purchases Enthusiasm among professionals nashik)

दिवाळीत वसूबारस, धनत्रयोदशीनंतर लक्ष्मीपूजनाला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसला. सकाळपासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसली. मोबाईलसह, लॅपटॉप, स्मार्ट घड्याळ, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओवनची सर्वाधिक विक्री झाली.

गत आठ दिवसांपासून दिवाळीचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांची वस्तूंची तुलना करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी दिसत होती. वस्तूची आगाऊ नोंदणी करून ग्राहकांनी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला.

इलेक्ट्रॉनिक बाजारात सर्वाधिक डबल डोअर फ्रीजला मागणी असल्याचे दिसून आले. टीव्हीत एलसीडी, एलईडी प्रकारांना मागणी होती. यंदा ओएलईडी प्रकाराला मागणी आहे.

ऑफर्स, सवलत, ईएमआयने खरेदीत वाढ

गणेशोत्सव, नवरात्र, दसऱ्यानंतर दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री दालनांनी वस्तूंवर विविध ऑफर्स, सवलत, नो कोस्ट ईएमआय पर्याय दिल्याने महागड्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसला.

विविध सवलतींमुळे खरेदीत वाढ झाल्याचे चित्र होते. ग्राहक हजारांपासून लाखापर्यंत वस्तू खरेदी करताना दिसून आले.

"इलेक्ट्रॉनिक बाजारात दिवाळीत सकारात्मक चित्र आहे. फायनान्स, नो कोस्ट ईएमआयसारख्या सवलतींमुळे ग्राहकांची वस्तू खरेदी करताना पाच हजारांपर्यंतची बचत होत आहे. यंदा दिवाळीत फ्रीजला सर्वाधिक मागणी आहे. टीव्ही, वॉशिंग मशिनची विक्री मोठी असून, वीस ते पंचवीस टक्के वस्तू खरेदीत वाढ झाली आहे."

- रवींद्र पारख, पारख अप्लायसेंस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT