A woman performs pooja after buying a vehicle on Sunday on the occasion of Diwali. esakal
नाशिक

Lakshmi Pujan 2023: दीपोत्सवात CNG, इलेक्ट्रिक चारचाकीसह दुचाकींची विक्री! वाहनांच्या दालनांना यात्रेचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा

Lakshmi Pujan 2023 : दिवाळी उत्सव आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत नागरिकांनी चारचाकी वाहनांसह दुचाकी गाड्यांची खरेदी केली. इलेक्ट्रॉनिक, सीएनजीसह पेट्रोल गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून येते.

तर दुचाकीमध्येही इलेक्ट्रॉनिक गाड्यांची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येते. वाहन खरेदीसाठी नागरिकांनी सकाळी शोरूममध्ये एकच गर्दी केल्याने वाहनांच्या दालनांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. (Lakshmi Pujan 2023 Sale of CNG electric four wheelers and twowheelers during Deepotsav Form of Yatra to Vehicle Halls nashik)

दीपावलीनिमित्त बाजारपेठेमध्ये चैतन्य असून, कपड्यांच्या बाजारात २५-३० कोटी, तर मोटारी आणि पाच हजारांवर दुचाकींची विक्री झाली आहे. मोटारींसह दुचाकी खरेदीचे प्रमाण गत वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक होते.

दिवाळीपूर्वी अनेकांनी वाहनांची नोंदणी केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुहूर्तावर वाहनांचा ताबा घेतला. रविवारी सुटीच्या दिवशी लक्ष्मीपूजन असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील वाहनांची दालने खुली होती.

बँकांना सुटी असल्यामुळे फायनान्सचे काम बंद राहिल्याने काही ग्राहकांना बुकिंगचा मुहूर्त साधता आला नाही. ऐनवेळी येणाऱ्या ग्राहकांसाठी दुचाकी उपलब्ध करून ठेवल्या होत्या.

दीपावली पाडवा व भाऊबीज या दिवशीही गाड्यांची विक्री होणार असल्याने बाजारात चैतन्य पसरले आहे. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार दिवाळीनिमित्त झाले.

फुलांच्या किमती वाढल्या

लक्ष्मीपूजनासाठी झेंडूसह शेवंती, गुलाब यांसह अन्य फुलांना सर्वाधिक मागणी होती. दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीला फुलांची आवक कमी झाल्याने सायंकाळी दर वधारले होते. झेंडूच्या फुलांचा प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दर यंदा ८० ते १०० रुपयांपर्यंत होता.

बाजार समितीत चार-पाच दिवसांत ४० ते ५० टन अर्थात रोज १० ते १२ मालमोटारींतून झेंडूच्या फुलांची आवक झाली. शेवंतीची फुले २०० ते २५० रुपये प्रतिकिलो होती. गुलाबाचे दर शेकड्याला २५० ते ३०० रुपयांपर्यंत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT