lalit patil case 25 lakhs to Lalit from woman help after absconding woman in police custody nashik Esakal
नाशिक

Nashik : ललितला नाशिकच्या महिलेकडून २५ लाख; फरार झाल्यानंतर केली मदत, महिला पोलिसांच्या ताब्यात

पाटील बंधूंच्या टोळीमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे पुढे येत आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : एकावेळी मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला अमली पदार्थ माफिया ललित पाटील याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असल्या तरी, पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर तो आधी नाशिकला आला. येथे एका महिलेकडून त्याला २५ लाख रुपये पुरविले गेले. ही २५ लाखांची रसद घेउन तो राज्याबाहेर फरार झाला, असे आता तपासात पुढे येत आहे.

ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर नाशिक पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या ‘एमडी’ या अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील तपासाला गती दिली. पाटीलचे ‘एमडी’ पोचविण्यात सहभाग असलेल्या संशयितांसह त्याला आर्थिक रसद पुरविण्यात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून ७ किलो चांदी हस्तगत केली. या महिलेवर ललितला २५ लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आज पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी ही माहिती दिली.

महिलांचा सहभाग

पाटील बंधूंच्या टोळीमध्ये महिलांचा सहभाग असल्याचे पुढे येत आहे. वडाळा येथील छोट्या भाभीशिवाय ललितला फरार होण्यासाठी २५ लाख पुरविण्याच्या संशयावरून आर्थिक सूत्रधार महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिंदे गावातील कारखान्यात ५ किलो एमडी सापडण्याच्या प्रमुख गुन्ह्यात इतरांना अटक केली आहे.

चांदीऐवजी पैसे

पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित नाशिकला आला. एकावेळी पुणे आणि नाशिक पोलिस मागावर असताना सगळ्या पोलिसांना गंडवित त्याला भूषण पाटील याने एका महिलेच्या मदतीने आर्थिक रसद पुरविली. चांदी देवू केली असता ललित याने चांदीऐवजी २५ लाख रुपये घेऊन नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT