नाशिक

काव्यरत्नावली चौकात ३२ फुटांचा भव्य ‘लामण दीप’

CD
ॲंकर NSK26H34735 जळगाव : काव्यरत्नावली चौकात साकारण्यात आलेला ३२ फुटांचा ‘लामणदीप’. -- काव्यरत्नावली चौकात ३२ फुटांचा भव्य ‘लामणदीप’ सात ज्योतींतून समृद्धीचा संदेश; ८०० किलो वजनाच्या कलाकृतीने वेधले जळगावकरांचे लक्ष सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : अंधार दूर करण्यासाठी एक दीप पुरेसा नसतो, तर प्रत्येकाच्या आयुष्यात आशा, विश्वास आणि प्रगतीची ज्योत प्रज्वलित होणे आवश्यक असते. याच उदात्त विचारातून जळगावच्या काव्यरत्नावली चौकात आकाशातून अवतरल्याचा भास निर्माण करणारा तब्बल ३२ फूट उंचीचा भव्य ‘लामण दीप’ साकारण्यात आला आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेली ही कलाकृती दिवाळीच्या रोषणाईत विशेष आकर्षण ठरत असून, सात ज्योतींच्या माध्यमातून सर्वांगीण समृद्धीचा संदेश देत आहे. भारतीय संस्कृतीत दीपाला ज्ञान, मांगल्य, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच परंपरेला आधुनिक कलात्मकतेची जोड देत या लामण दीपाची रचना करण्यात आली आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, सुरक्षा आणि धार्मिक अशा जीवनातील सात महत्त्वाच्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात ज्योती या दीपात साकारण्यात आल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात या सातही क्षेत्रांत प्रगती आणि समृद्धी यावी, हा या संकल्पनेमागील मुख्य विचार आहे. आकाशाशी बंध, मातीशी नाते! या लामण दीपाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना. नाजूक धाग्यांमध्ये गुंफलेला हा भव्य दीप पाहताना जणू आकाशातून एखादी दिव्य कलाकृतीच पृथ्वीवर अवतरली आहे, असा भास होतो. ‘बंध आकाशाशी आणि नाते धरतीशी’ ही त्यामागील संकल्पना आहे. या दीपातील प्रत्येक ज्योत सहा फुटांपेक्षा अधिक आकाराची आहे. मानवी अंतर्मनातील भावना, आशा, आकांक्षा आणि संवेदनशीलतेचे प्रतिबिंब या ज्योतींमधून उमटते. सुमारे ८०० किलो वजन आणि ३२ फूट उंची असलेला हा लामण दीप काव्यरत्नावली चौकाच्या सौंदर्यात भर घालत असून, नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. महिनाभराच्या मेहनतीतून कलाकृती साकार जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या लामण दीपाची निर्मिती करण्यात आली. गेल्या महिनाभरापासून जैन इरिगेशनच्या कला विभागाचे विजय जैन, डेव्हलपमेंट विभागाचे अनिल पाटील, चंद्रशेखर विरपणकर आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांनी ही कलाकृती साकारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. दीपाच्या सजावटीमध्ये राजेश नाईक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. चौकट जळगावकरांचे वैभव वाढावे : अशोक जैन प्रकाशाचा उत्सव साजरा करताना इतरांच्याही जीवनात उजेड निर्माण करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावी, हाच या लामण दीपाचा खरा संदेश आहे. दीप स्वतः जळतो, तेव्हाच परिसर प्रकाशमय होतो. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात प्रगतीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी संवेदना, सहकार्य आणि समर्पण आवश्यक आहे. जळगाववासीयांच्या जीवनात सुख, समाधान आणि सर्वांगीण समृद्धी नांदो, याच मंगल भावनेतून काव्यरत्नावली चौकात हा लामण दीप उभारण्यात आला आहे, असे न इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR Controversy: कितीही अटक करा, देशभरात तिरंगा फडकावतच राहणार! अभिजीत दिपकेंचा कोचीत एल्गार

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Payal Jhambre Case : हुंडाबळी प्रकरणाचा तपास वेगवान; पायल झांबरे प्रकरणात ३५ तोळे सोने, मोबाईल व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात, पतीसह सासू-सासऱ्याच्या कोठडीत वाढ

Latest Marathi News Live Update: शरद पवारांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते सिल्वर ओकवर; तीन तासांपासून बैठक

Gevrai Cylinder Blast Fire Accident News : गेवराईत दिवाळीत गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी; चार घरे व दुचाकी जळून खाक, संजयनगर भागातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ

SCROLL FOR NEXT