नाशिक

लामकानीत डेंगी-मलेरिया प्रादुर्भाव

CD
लामकानीत डेंगी- मलेरियाचा प्रादुर्भाव अनेक बालकांवर उपचार सुरू; ग्रामस्थांमध्ये संताप सकाळ वृत्तसेवा लामकानी, ता. २८ : लामकानी गावात डेंगीसह मलेरिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील अनेक नागरिक आजारी पडले असून, अनेक बालकांवर धुळे शहरातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आजारपणामुळे ग्रामस्थांना आरोग्याच्या समस्यांसोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. गावातील अनेक ठिकाणी सांडपाणी साचणे आणि केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागणे, या समस्या गंभीर बनल्या आहेत. परिसरातील अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंगी व मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असतानाही स्वच्छतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. लहान मुलांना आजाराची लागण होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागत असल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तातडीने उपाययोजनांची मागणी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने गावातील अस्वच्छतेची पाहणी करून सांडपाण्याचा निचरा, केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट, डास प्रतिबंधक फवारणी आणि आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. डेंगी व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC election results: चार राज्यांतील 28 जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला एकही नाही; सत्ता असूनही कर्नाटकात काँग्रेसची धूळधाण

Pune News : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्राधान्याने काम करणार, टीकेला कामातून उत्तर देणार; कौस्तुभ गावडे यांची ग्वाही

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT