नाशिक

भूसंपादनाचा मार्ग मोकळ करण्याची मागणी

CD
सिंहस्थासाठी भूसंपादनाला वेग नुकसानभरपाईची मागणी तातडीने सादर करण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम, अंतर्गत व बाह्य वाहनतळ, होल्डिंग एरिया, हेलिपॅड तसेच अन्य सुविधांसाठी प्रस्तावित जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अधिग्रहित जमिनींच्या मालकांना देय नुकसानभरपाईची मागणी तातडीने सादर करून पुढील कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक जमिनींचे अधिग्रहण करून जमीनमालकांना देय नुकसानभरपाई निश्चित करणे आवश्यक आहे. प्रस्तावित क्षेत्रासाठी संबंधित अधिग्रहण संस्थेकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली असली, तरी त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिले आहे. महाराष्ट्र जमीन अधिग्रहण कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक नुकसानभरपाईची मागणी तातडीने प्राधिकरणाच्या नियोजन शाखेकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधांच्या कामांना अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कुंभमेळा आयुक्त कार्यालयाने नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित प्रांत व तहसील कार्यालयांना याबाबत कळवून आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त कमलाकर रणदिवे यांनी यासंदर्भातील पत्र जारी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test ड्रॉ झाला, आता भारत WTC Final मध्ये कसा पोहोचणार? न्यूझीलंडचे झाले खूप नुकसान; जाणून घ्या समीकरण

Gold Rate Today: लग्नसराई सुरू होताच सोनं महागलं! 3 आठवड्यांच्या घसरणीला ब्रेक; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरात किती झाला भाव?

माजी मुख्यमंत्र्यांचा बहिणीसोबत मालमत्तेवरून वाद, बहिणीसह आईला वडिलोपार्जित बंगल्यात जाण्यापासून रोखलं

Latest Marathi News Live Update: ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस उत्पादक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Yerawada Historic Well: येरवड्यात आढळली पेशवेकालीन विहीर; उड्डाणपुलासाठी ऐतिहासिक वास्तू बुजविली जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT