Nashik-Pune semi high speed railway  esakal
नाशिक

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादनाचे दर ठरले...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. सिन्नर तालुक्यातील चार गावांतील जिरायती जमिनींसाठी साधारण प्रतिहेक्टरी ५५ लाखांपासून, तर ६८ लाखांपर्यंत जिरायती जमिनींचे (Arable lands) दर जाहीर झाले आहेत. यात, बारागावपिंप्री, पाटपिंप्री, वडझिरे आणि दातली या गावांतील मूल्यांकनाबाबत बुधवारी (ता. ३०) या दर निश्‍चितीवर शिक्कामोर्तब झाले, तर प्रशासनाकडून गुरुवारी (ता. ३०) या दरांची घोषणा झाली. अवघ्या पावणेदोन तासांत नाशिकहून थेट पुण्याला जाणाऱ्या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Gangatharan D.) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भूसंपादन समितीच्या बैठकीत या चार गावांतील भूसंपादनाचे दर निश्‍चित झाले.

२८६ हेक्टर भूसंपादन

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला सुरवात होणार आहे. शासनाकडून वाटाघाटींद्वारे थेट खरेदीने भू-संपादन करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील २२ गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार असून, त्यात सर्वाधिक १७ गावे सिन्नर तालुक्यातील आहेत. वडगाव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी मजरे, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, मानोरी, दोडी खुर्द, दोडी बुद्रुक, नांदूरशिंगोटे या गावांची संयुक्ती मोजणी करीत २४८.९० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. तर नाशिक तालुक्यातील विहितगाव, देवळाली, बेलतगव्हाण, नाणेगाव, संसारी या गावांतील ३७.२२, असे एकूण २८६.१२ हेक्टर क्षेत्र संपादित होणार आहे.

प्रतनिहाय क्षेत्र

गावाचे नाव जमीन आकारणी ग्रुप प्रतिहेक्टर दर घ्यावयाचे क्षेत्र

पाटपिंप्री प्रत एक ५५.६१.४६५ ०.१८ हेक्टर

बारागावपिंप्री प्रत एक ६२.६४.०६५

प्रत दोन ६३.८९.३४५ १९.४२ हेक्टर

प्रत तीन ६८.२७.८३०

वडझिरे प्रत एक ५७.६४.०६५

प्रत दोन ५८.७५.२८५ २२.४८ हेक्टर

दातली प्रत एक ५२.०४.७५०

प्रत दोन ५३.६०.८९५ ९.६२ हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT